आभाळ भरून आलं. कोणत्याही क्षणी तो कोसळेल असे वातावरण. सगळीकडे काळोख दाटला. अधून मधून वादळाची चाहूल. आणि मंदाताई बेडवर टेकून बसून बघत होत्या. हेडफोन लावून गाणी ऐकत होत्या. का रे दुरावा. का रे अबोला. आणि मागील सगळेच आठवायला लागले. एका मध्यमवर्गीय कुटुंबात मंदाताईचा जन्म झाला होता कुटुंब खूप मोठे होते तसेच अत्यंत करडी शिस्त जरब . त्यामुळे स्वभाव असा बनला की सतत काम करणे. कोणत्याही परिस्थितीत समाधानी. वेळ पडल्यास इतरांच्या चुका स्वतःच्या अंगावर घेऊन शिक्षा भोगणे. एकंदरीत दुसर्या साठी जन्म तिचा. त्यामुळे मारतांना वडिलांना दिलेले वचन पूर्ण केले. सगळीच घराची जबाबदारी घेतली. त्यानंतर लग्न उशिरा झाले. पुढे सासरी पण तेच सगळ्यांना मार्गी लावले. अगदी नवऱ्याचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करून त्यांना व्यवसायात मान प्रतिष्ठा पैसा सगळे काही मिळवायला खूप मेहनत घेतली होती.नवऱ्याचा जम बसे पर्यंत सगळीच जबाबदारी पार पाडताना तिचे काय झालं ते देवाला माहित.आणि हे सगळे नोकरी सांभाळून. पण कधीही त्याचे श्रेय घेतले नाही. आणि याच स्वभावाचा अनेकांनी गैर फायदा घेतला पण ही शांतच. कधीच पैसा स्वतःचा असूनही वापरला नाही चैन केली नाही.सगळा आर्थिक व्यवहार नवऱ्याने कडे होता..
तरुण पणात काही घडले नाही पण आता मंदाताई रात्रंदिवस अंथरुणावर आहेत. आताही तोच स्वभाव. कुठलीही तक्रार नाही. जसे असेल ते चांगलेच आहे असे म्हणत दिवस घालवत आहेत. अनेकदा छोटे छोटे वाद भांडण झाली. दरवेळी माघार घेतली तू तू मै मै केले नाही. आणि इतकी वर्षे झाली पण एका क्षुल्लक कारणावरून आततायीपणा केला. नवऱ्याने तीआजारी आहे. आजपर्यंत किती कशी साथ दिली हे सगळे एका क्षणात नाहिसे झाले. जन्माचा साथीदार यांनी अबोला दुरावा निर्माण केला. अगदीच घरात कुणी नसेल तर थोडी फार मदत केली जाते. नाईलाजाने. नातं तोडून टाकले आहे.खर तर या वयातच एकमेकांना साथ देण्याची गरज जास्त असते. त्यामुळे आधार वाटतो. मन शांत होते. आणि इतरांना सांगून काय उपयोग.
आता बाहेरचे जग याचा संबंध तुटला आहे. मुल मुली नातवंड आपापल्या संसारात रमली आहेत. म्हणून तिच जग हे फक्त या खिडकीतून जेवढे आभाळ दिसते तेवढेच अंगणातील झाड एखाद्या पक्षी बाकी काही नाही. बाहेर पाऊस पडत नाही पण तिने आपल्या डोळ्यातील आलेल्या पुराला आडवले नाही म्हणून आर्ततेने तेच गीत गात आहे..
–सौ कुमुद ढवळेकर
Leave a Reply