काय म्हणावे स्त्रिला, जादूगार कि किमयागार?
कि आयुष्याच्या रंगभूमिची, चतुरस्त्र कलाकार?
दुर्गा-काली, लक्ष्मी-सरस्वती, रुपे तिची चार
अष्टावधानी चित्ताची ती एक चतूर नार |
ध्यास घेऊनी धैर्यानी ती, लढा देते सार्थ,
तिच्या अंगी करारीपण अन, निर्णयाचे सामर्थ्य |
“झांशिची राणी”, “जिजाऊ” ह्या तर, मूर्तिमंत आदर्श
सावित्रीबाई – रमाबाईचे स्तिमित करते कार्य |
जीवन देऊनी जगणे तुमचे, नारी करते कृतार्थ
तिच्याविना घरपणच काय, सारीच नाती व्यर्थ |
कोमल भाऊक मनी तिच्या, कमालिची सोशिकता
दुसरा जीव वाढवण्याची, उदरी देखील क्षमा |
जीवासाठी त्या, तिच्या ह्रदयी, वात्सल्याचा झरा
कुणी न विसरे बुरुजावरुनी, उडी घेणारी “हिरा” |
विविध क्षेत्री आजही “स्त्रिची”
जिद्द धडाडी, योग्यता
“तिच्यासारखी तिच” खरोखर
जाणून आहे विधाता
हे जाणून आहे विधाता |
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply