नवीन लेखन...

तिकीट तपासनीस (तिकीट चेकर)

रेल्वेमधला तिकीट तपासणीस अर्थात टी.सी. हा एक स्वतंत्र विषयाचा मामला आहे. या टी.सी.नावाच्या व्यक्तीबद्दल प्रवाशांच्या मनात नेहमीच थोडीशी भीती असते आणि आतून सुप्त राग खदखदत असतो. ‘प्रसंगी दंडाची रक्कम यांच्या हातांत पैसे दाबून टाळता येते’, ‘ते लाचखाऊ असतात’ असाही एक अपसमज जनसामान्यांमध्ये ठसलेला असतो.

प्रवाशांवर वचक ठेवणारे आणि स्वत:विषयीचे समज-गैरसमज सोबत घेऊन काम करणारे हे टी.सी. (मेल, एक्सप्रेस गाड्यांचे) नेहमी वकिलांसारख्या काळ्या कोटात असतात. स्टेशनच्या मुख्य दरवाजावरील व लोकलवरील टी.सी. मात्र बऱ्याच वेळा साध्या कपड्यात असतात. अचानक धाडीची मोहीम असेल, त्यावेळी प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक टी.सी. साध्या कपड्यांत शांतपणे उभे असतात. प्रवासी उतरताच त्यांना घेराव घालून ते आपले काम पार पाडतात. मुंबईत पूर्वी लोकलगाडीत चढणाऱ्या टी.सी.ना ‘मामा’ म्हटलं जाई.

या तिकीट तपासनिसांची मुख्य कामं अशी असतात:

१. प्रवाशांची तिकिटं तपासून ती योग्य आहेत किंवा नाही ते पाहणं.

२. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडणं, त्यांच्याकडून दंड वसूल करणं, व पैसे नसल्यास रेल्वे पोलिसांच्या मदतीनं त्यांना तुरुंगात टाकणं. असे प्रवासी शोधून काढणं हे कौशल्याचं काम तर असतंच, परंतु यामध्ये काही वेळा मारामारीच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागतं.

३. जमा झालेली रक्कम, तिकिटं, पासेस, कार्यालयात सुपुर्द करायचे असतात.

४. रेल्वेतील जुने, नवे असे लाखो कर्मचारी पासवर प्रवास करीत असतात.

ते सर्व व्यवस्थितपणे पडताळून पाहावं लागतं.

५. शाळा, कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना पासवर मिळणारी सूट, ५ वर्षांखालील मुलामुलींचं अर्धं तिकीट यांवर नजर ठेवावी लागते.

६. मेल व एक्सप्रेस गाड्यांतील प्रवासी आरक्षण यादीप्रमाणे आहेत किंवा नाहीत हे पाहणं, रिकाम्या अनारक्षित (बर्थवर) प्रवाशांची भाड्याचे पैसे भरून घेऊन सोय करून देणं, ज्येष्ठ नागरिकांच्या ओळखपत्रांवरील वय तपासून घेणं.

७. लोकसभा-सदस्य प्रवास करत असताना त्यांचा वेगळा फॉर्म भरून घेणं.

८. अनेकदा तिकिटं काढलेल्या दिवसानंतर तिकिटांच्या दरात वाढ होते. त्यावेळी जास्तीचे पैसे प्रवाशांकडून गोळा करावे लागतात आणि हे काम तर तिकीट तपासनिसांची परीक्षा पाहणारं असतं.

९. साधू, भटकी मुलं, गरीब स्त्रिया व मुलं अनेकदा तिकीट न काढता जागा अडवितात, त्यांना गाडीतून बाहेर करावं लागतं.

१०. जागेवरून प्रवाशांत होणारे तंटे ताबडतोब मिटविणं.

११. प्लॅटफॉर्म तिकिटं तपासणं.

१२. स्त्रियांसाठीच्या डब्यांत तिकिटांची तपासणी.

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या तिकीट तपासनिसांना झोपण्यासाठी एक बर्थ ठेवलेला असतो; परंतु या प्रवासात मध्यरात्री, भल्या पहाटे वाटेतील येणाऱ्या स्टेशनांवर एखादा प्रवासी उतरणार असेल तर त्याला उठवण्याची (जागेवरून त्यांच्या उतरण्याच्या स्टेशनावर उतरवण्याची जबाबदारी टी.सी.वरच असते. प्रत्येक स्टेशनवर नव्यानं चढणाऱ्या प्रवाशांची सोय पाहणं हेही टी.सी.लाच बघावं लागतं.

बारा ते चौदा तासांची ड्युटी व त्यात स्वत:च्या घरी जाण्यास होणारा विलंब, यांमुळे त्यांना घराकडे लक्ष देता येत नाही. राजकारणी लोक प्रवासात असताना त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते असतात. अशाप्रसंगी लक्ष पुरविताना टी.सी. मंडळींची अगदी दुहेरी पातळीवर दमछाक होते; कारण, ते कार्यकर्ते सर्व नियम धाब्यावर बसवितात व त्यांच्याविषयी इतर प्रवासी तक्रारी करतात. रेल्वे खातं हे आपल्याला वेळी अवेळी होणाऱ्या झोपण्याच्या गैरसोईबद्दल व शिव्या खाण्यासाठी पगार देत’ अशी टी.सी. कर्मचाऱ्यांची तक्रार असते.

मनुष्यस्वभावाप्रमाणे व परिस्थितीनुसार काही तिकीटतपासनीस संधीचा फायदा घेऊन खाबुगिरी करीतही असतील, परंतु बरेच टी.सी. कामात दक्ष असल्यामुळे दर महिन्याला विनातिकिटाच्या दंडातून कोट्यवधी रुपये जमा करतात. २०१४ या वर्षात व्ही.टी. स्टेशनवरील धर्मेंद्रकुमार या तिकीटतपासनिसानं एका महिन्यात १२ लाख रुपये एवढी रक्कम निव्वळ दंडामधून वसूल केली होती. हा एक विक्रम आहे. तरीही, मनुष्यस्वभावातील फसविण्याची वृत्ती वाढतच आहे व रेल्वेला आपली टी.सी.ची फौज वाढवावी लागते आहे.

डॉ. अविनाश वैद्य

Avatar
About डॉ. अविनाश केशव वैद्य 179 Articles
भटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..