मधे एकदा सहज म्हणले
टिकली पडल्ये.
उत्तर आले
लावते.
मग सांगीतले
नीट नाही ग लागली.
” तूच सारखी कर “
उत्तर आलं.
काहीही न सांगता
हळूच बिलगलीस
” ज्याचे नाव, त्याचे हात “
गोड छान कुजबुजलीस.
एक टिकली
इतके बोलते
एक नाते
जोडून जाते
–चन्द्रशेखर टिळक
१८ डिसेंबर २०२२
Leave a Reply