MENU
नवीन लेखन...

टिकवाल तर टिकेल

डिसेंबर महिन्यात शेवटच्या दिवशी सरत्या वर्षाला निरोप देण्यात येतो. त्यामुळे ज्यांना जसे जमेल तसे हा दिवस साजरा केला जातो. खर तर जमेल तसे नाही तर जमवूनच आणतात. कुणी सिनेमा. कुणी नाटक. कुणी सहलीला. कुणी कुठे कुणी कुठे रमतात. तर काही ठिकाणी सोसायटीचे सगळेच घरातील एकत्र येऊन नाच गाणी खेळ गप्पा आणि नंतर जेवण किंवा अल्पोपाहार. रात्रीच्या खूप उशिरा पर्यंत हे चित्र दिसते. छान वाटले बघून. आणि पूर्वी नव्हते असे काही. कदाचित मोठ्या शहरात असेल पण आता अगदी खेड्यात सुद्धा सुरू झाले आहे…

पण मला जे वाटलं ते पाहून अगदी मनापासून वाटत की ज्या वर्षाला आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निरोप देतो. पण जे असेच जुने म्हणजे जाण्याच्या वाटेवर आहेत जे मागे राहिले तेवढे वर्ष पुढे राहणार नाहीत अशा लोकांच्या सहवासात पण थोडा वेळ घालवायला हवा. वय आजार परावलंबी अंथरुणावर असल्याने कशातच सहभागी होऊ शकत नाहीत. पण घरातील शांतता एकटेपणा किती त्रासदायक असतो हे तेच जाणो. त्यामुळे थोडा वेळ हाच गेट टु गेदर अशा मंडळींना किती समाधान देणारी आहे याचा विचार करून बघा एकदा. लहान असे तोवर घरात वाढदिवसाच्या निमित्ताने चार लोक जमतात. मुले आनंदी असतात. एका बाजूला बसून सगळे बघायला मिळेल या आशेने होत नसले तरी बसून राहतात. हीच तर त्यांची उर्जा असते जगण्याची. मुले मोठी झाली की बाहेर. आईबाबांचा वाढदिवस बाहेर. लग्नाचा वाढदिवस बाहेर. ३१ डिसेंबर बाहेर अरे काय चाललय. जाण्याची मनाई नाही पण किमान घरी थोडा कमी प्रमाणात साजरा करुन आशीर्वाद तरी घ्यायला हवा ना..

संस्कार वर्गात घालायची गरज नाही जर अशा दिवशी सोसायटीत जमलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील मुलांनी बायकांनी पुरुषांनी अगदी वयोवृद्ध व्यक्तीनीं सुद्धा एक संकल्प केला तर आणि तोही सगळ्या देखत. पहा कसा बनवायचा आणि कसा पूर्ण करायचा.

उदा दूध पिणार. भाजी खाणार. आपले ताट उचलणार. कपबशी धुवून ठेवणार. एक जोड पायातील वापरणार. आपले काम आपणच करणार. सामाजिक बांधिलकी म्हणून एक तरी जबाबदारी उचलणार अजून बरेच काही जे जे आवश्यक असते ते ते. नुसते तोंडी नाही तर वर्तनात आणले पाहिजे. आणि यातून वृद्धांना देखिल सहभागी करून घेतले तर तेही स्वखुशीने संकल्प करतीलच. निरोपाची वेळ त्यांची आहे. त्यामुळे ते सुखी समाधानी असणे आवश्यक आहे. नवीन वर्षाच्या वेळी असे निराश उदास एकटेपणा भोगत भूतकाळ आठवत जगणे मुश्किल असते. उलट त्यांच्या सोबत राहून त्यांचे आनंदी क्षण. जीवन ऐकण्यात. जीवनाच्या चढ उताराची कहाणी. आणि आईवडिलांनी कसे बळ दिले नातवंड झाली की त्यांचा आजार कसा पळून गेला लाड कसे केले किती आज्जी आजोबा यांच्या काळात शाळा शिक्षक शिक्षण कसे होते. संकटाला तोंड कसे दिले होते. आठवणींचा खजिना असतो तो बघा. हे बोलताना आपण आजारी नाही या विचाराने झालेला बदल किती सुंदर वाटते. खऱ्या नवीन वर्षाची सुरुवात हीच तर घरातील आंनदाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे ती हरवून गेली की समाधानाचे दार उघडणार नाही.
सौ कुमुद ढवळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..