टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो.
महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार लोकमान्यांचे शैक्षणिक स्मारक म्हणून ६ मे १९२१ रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची (टिमवि) स्थापना झाली.
कुर्तकोटीचे शंकराचार्य विद्याशंकर भारती हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. त्यानंतर हे पद चिं.वि. वैद्य, दत्तो वामन पोतदार, बापूजी अणे, आदी विद्वानांकडे होते. १९८७ मध्ये भारत सरकारने या विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला.
विद्यापीठात हॉटेल व्यवस्थापन, फिजिओथेरपी, मास मीडिया, कायदा, रुग्णशुश्रूषा, भारतविद्या (इंडॉलॉजी), वृत्तपत्रविद्या, संगणक शास्त्र, जपानी-जर्मन-संस्कृत-इंग्रजी भाषाया विषयांचे पदविका/पदवी इत्यादी अभ्यासक्रम चालविण्यात येतात.
लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षणाचा वारसा टिमविने समर्थपणे रुजवला आहे वाढवला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची भारत स्वातंत्र्य लढय़ात योगदान देण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातली शिक्षणप्रणाली प्रत्यक्षात आणण्यासाठी महात्मागांधीनी पुढाकारघ्यावाही भारतीय इतिहासातील एक सुभग घटना म्हणावी लागेल.
एका अर्थाने एका दृष्ट्या राष्ट्रभक्ताला आणि राष्ट्रीय शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या युगपुरुषाला एका महात्म्याने दिलेली ही मान वंदनाच आहे.
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply