एखादा चित्रपट सध्याच्या तरूणाईला सकारात्मक व गंभीरपणाने प्रेमाकडे पाहण्याची शिकवण देत आहे अस समजायला काहीच हरकत नाही. कोणीही टाइमपास चित्रपट टाइमपास म्हणून पहावा असा नक्कीच नाही. मराठी चित्रपटसृष्टीच्या खजान्यात या चित्रपटामुळे आणखी एका रत्नाची भरच पडलेय अस म्हणायला काहीच हरकत नाही. ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल त्यांनी तो पुन्हा पुन्हा पहावा आणि ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी तो नक्कीच पहावा. टाइमपास करण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तो पाहण्यासाठी पैसे खर्च करणे उत्तमच नाही का ?
दगडू आणि प्राजक्ता यांच्या प्रेमकथेवर बेतलेला ‘टाइमपास’ हा चित्रपट अतिशय अप्रतिम आहे. चित्रपटाच्या शिर्षकात जरी टाइमपास असला तरी चित्रपटात यकिंचितही टाइमपास केलेला दिसत नाही. संपूर्ण चित्रपट अगदी सुरूवातीपासून शेवटापर्यत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झालेला दिसतो. या चित्रपटाची जमेची बाजू ही आहे की हा चित्रपट लोकांनी पुन्हा पुन्हा चित्रपटगृहात जावून पाहिला आणि पाहता आहेत. हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांना प्रत्येक वेळी नव्याने चित्रपट पाहण्याचा आनंद मिळतोय. हा चित्रपट वरकरणी जरी विनोदी असला अथवा वाटत असला तरी त्यातून समाजातील अनेक ज्वलंत समस्यांनाही ह्ळूवार हाताळण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असतानाही कोठेही अशी दृष्ये चित्रीत केलेली नाहीत ज्यामुळे पालकांना आपल्या पाल्यांसोबत हा चित्रपट पाहताना संकोच वाटावा, हे असं करण हा प्रकारही सामाजिक जाणिव जपण्याचाच एक भाग म्ह्णावा लागेल. या चित्रपटातील संवादात मराठी सोबतच मालवणी आणि हिंदी भाषेचाही योग्य वापर करून घेतलेला दिसतो ज्यामुळे हा चित्रपट पाहण्याकडे हिंदी भाषिक तरूणाईचाही कल दिसतो ही या चित्रपटाची जमेची बाजूच म्ह्णावी लागेल.
या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम नव्हे तर अप्रतिम अभिनय केलेला आहे यात शंका घेण्याला वावच नाही. या चित्रपटातील गाणी आजकाल जेंव्हा लोकांच्या मोबाईलवर रिंगटोन म्ह्णून सर्रास वाजताना दिसतात आणि या चित्रपटातील सवांद अगदी चार- पाच वर्षाच्या मुलांच्या मुखातून कानावर पडतात तेंव्हा या चित्रपटाच यश सिध्दच होत असत. या चित्रपटाने पैसा किती कमावला यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही त्यापेक्षा आज त्या चित्रपटाने समाजाला काय दिल यावर चर्चा होण अधिक मह्त्वाच आहे आता एक महिन्याच्या अंतरावर व्हॅलेन्टाईन डे सारखा दिवस जवळ असतान टाइमपास सारखा चित्रपट तरूणाईला बरेच काही सकारात्मक शिकवून जातोय असं म्ह्णायला वाव आहे. हा चित्रपट जेष्ठांना त्यांच्या भुतकाळातील प्रेमप्रकरणांची आठवण करून देण्याबरोबरच त्यांना ही प्रेमाकडे प्रेमाने पाहण्याची शिकवण देवून जातो, प्रेम ही एकमेव अशी गोष्ट आहे जी एखादा माणूस कितीही कठोर आणि क्रूर असला तरी त्याच्या आयुष्यात एकदातरी त्याला प्रेमाच्या प्रेमात पडण्याचा मोह टाळता येत नाही. टाइमपास या चित्रपटात या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेमाचा विषय अतिशय ह्ळुवार हाताळलाय आणि शिताफीने उलगडण्याचाही प्रयत्न केला आहे. समाजात प्रेमाला टाइमपास समजणारी पिढी झपाटयाने वाढतेय. अशात टाइमपास सारखा एखादा चित्रपट सध्याच्या तरूणाईला सकारात्मक व गंभीरपणाने प्रेमाकडे पाहण्याची शिकवण देत आहे अस समजायला काहीच हरकत नाही. कोणीही टाइमपास चित्रपट टाइमपास म्ह्णून पाह्वा असा नक्कीच नाही. मराठी चित्रपटसृष्टीच्या खजान्यात या चित्रपटामुळे आणखी एका रत्नाची भरच पडलेय अस म्ह्णायला काहीच हरकत नाही. ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल त्यांनी तो पुन्हा पुन्हा पाह्वा आणि ज्यांनी नसेल पाहिला त्यांनी तो नक्कीच पाह्वा. टाइमपास करण्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तो पाहण्यासाठी पैसे खर्च करणे उत्तमच नाही का ?
— निलेश बामणे
Leave a Reply