नवीन लेखन...

तिरसट म्हातारा

नाना झिपरेनी आपला हट्ट सोडला नाही . त्याने पुन्हा झाडावर लटकणाऱ्या प्रेतास खांद्यावर घेतले  व स्मशाना कडे निघाला ! नेहमी प्रमाणे वेताळ प्रेतात प्रवेश करून बोलू लागला .
“नान्या ,लोक तुला चक्रमादित्य का म्हणतात ते आत्ता मला उमगू लागलंय . तू एक हट्टी ,दुराग्रही ,आणि चक्रम माणूस आहेस ! तुझ्या कडे सर्व आहे ,तरी मला प्रसन्न करून तुला कायमागायचे आहे,माहित नाही ? तरी तुझा आणि माझा ‘टाइम पास ‘ व्हावा म्हणून , एक ब्रँड न्यू  गोष्ट सांगतो ”
गोष्ट फ्रॉम घोस्ट ,नाना झिपरे कान देऊन ऐकू लागला . हा वेताळ गेल्या जन्मी बहुदा मास्तर असावा . कारण हा गोष्ट सांगतो आणि मग त्यावर प्रश्न पण विचारतो !

‘आट -पाट नगर होते . तेथे एक दवाखाना होता .
सकाळचे नऊ वाजून गेले होते . ‘तो ‘ बरोबर  नवाच्या ठोक्याला आला होता . आल्या आल्या त्याने रिसेप्शनिस्ट कडे नाव नोंदवले .
साडे नऊ झाले . अजून डॉक्टरचा पत्ता नव्हता . चार सहा पेशंट मात्र वाढले होते . त्याची चुळबुळ सुरु झाली .
“डॉक्टर केव्हा येणार ?” दुसऱ्यांदा त्याने रिसेप्शनिस्टला विचारले .
” आजोबा ,घाई करू नका .! शांत पणे जागेवर बसून रहा ! अत्ता  येतील डॉक्टर . ” ती जरा वैतागलीच होती . काय एक एक पेशंट असतात , जरा पण धीर धरवत नाही . आणि म्हातारे तसे कटकटीचेच असतात . या थेरड्याला थोडं थांबायला काय धाड  भारलीय ?
दहा वाजले .! डॉक्टरांचा अजून हि पत्ता नाही !
काठी टेकवत तो पुन्हा रिसेप्शनिस्ट कडे गेला .
” हे पहा आजोबा ( थेरड्याच तिला म्हणायचे होते ), दर पाच मिनिटांनी ‘डॉक्टर कधी येणार ?’ म्हणून असे विचारल्याने ते काही लवकर येणार आहेत का ? , तुम्ही उगाच मला त्रास देऊ नका ! आणि स्वतःला पण करून घेऊ नका ! ”
” अहो ,पण मी काय म्हणतो ते तर ऐकून घ्या . ”
“बोला ” ती बहुदा चिडण्याच्या सीमेरेषेवर पोहचली होती .
” मला ना वेळ नाही !प्लीज उद्याची अपॉइंटमेंट देता का ?”
“काय ? वेळ नाही ? अहो आजोबा या वयात तर तुमच्या कडे फक्त वेळ अन वेळच असावा ! असे काय काम आहे कि तुम्ही डॉक्टरांसाठी थांबू शकत नाहीत ? घरी कटकट केल्या पेक्षा इथंच टाइम पास  चांगला होईल !”
तिच्या कॉमेंट ने रिसेप्शन हॉल मध्ये चांगलीच खस खस  पिकली . काय तर म्हणे म्हाताऱ्याला वेळ नाही! स्वतः च्या तब्बेतीसाठी वेळ नाही ? खरच हल्ली म्हातारे भारी तिरसट झालेत .  असेच काहीसे विचार बहुतेक उपस्थितांच्या मनात नाचत होते .
” अरे, असे हस्ताय काय ?, जरा शांत डोक्याने विचार करा ! म्हणे ‘ येथेच टाइम पास करा ‘ कसला टाइम पास ! ‘टाइम ‘ कोणाला पास  करता येतो !?  तुम्ही काय टाइम पास  करता ? ‘टाइम ‘ तुम्हाला पास  करतोय ! ‘काळाचे भान ठेवा रे बाबानो !, अन ‘ माझ्या वेळेचं ‘ म्हणलंतर आज मी पंचाहत्तरी पार केलीय ! माझे किती दिवस राहिलेत माहित नाही ! येथे जितकेजण  आहेत त्यांच्या पेक्षा माझ्या कडे खूपच कमी ‘वेळ ‘ आहे ! आणि हा राहिलेला वेळ किती मौल्यवान आहे हे कळायला माझ्या वयाचे व्हावे लागते ! दवाखाना उघडण्याची वेळ नवाची लिहायची !अन आपण मात्र अकराला  यायचे ! असे का ? पेशन्टला गृहीत का धरता ? याला पेशन्टचा विश्वासघात म्हणायचा , कि बेजवाबदार पणा ? ” इतके बोलल्यावर त्याला धाप लागली . कोणीतरी पाणी देऊ केले . त्याने ते हलकेच नाकारले .
” आता आम्ही देहाने थकलोय , आवर शक्ती क्षीण झालीय . मला कोणालाच दुखवायचे नाही . डॉक्टरनं कडे आम्ही देवाचे रूप म्हणून पहातो ! थोडी वेळेची शिस्त पाळावी , एवढेच म्हणणे आहे ! ”

तो डगमगत्या पावलांनी दवाखान्या बाहेर पडताना ,रिसेप्शन हॉल मध्ये फक्त त्याच्या चपलांचा आणि काठी टेकल्याचा आवाज घुमत राहिला . …. बाकी स्मशान शांतता होती .! ‘

झिपऱ्याला समोर स्म्शानचे गेट दिसत होते . आणि वेताळाने गोष्ट सम्पवली !
” नानबा आता सांग म्हातारा खरच  तिरसट होता का ? ” वेताळाने प्रश्न केला
” वेताळा , …… ”
” झिपऱ्या ,तू मौन तोडलस  ! मी निघालो ! पुन्हा भेटूच ! Bye !

वेताळ पुन्हा झाडाला लटकू लागला . !

— सु र कुलकर्णी 

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..