त्याच्या चांगुलपणावर
ती पूर्ण हरते,
स्त्री कमी की पुरुष अधिक
ह्याची व्याख्या तिला न कळते..
तिच्या समजण्याच्या बाहेर
त्याचा चांगुलपणा तिला कळतो,
स्त्री पेक्षा पुरुष जास्त
कणखर नक्कीच असतो..
तिच्या पेक्षा तो
जास्त सरस तिला जाणवतो,
तिच्या अस्तित्वाच मूल्य तेव्हा
तिला नकळत बोचतं..
त्याच्या अव्यकतेत
तिच्या चुका तिला कळतात,
अबोल पणात त्याच्या
तिच्या भावना कोमेजतात..
ती स्त्री आणि तो पुरुष
हाच मोठा फरक असतो,
मन दोघांना असतं पण
फरक दोघांच्या भावनेत असतो..
त्याला समजतांना ती
कमी नक्कीच पडते,
कुठेच कमी नाही तो हीच
का पुरुष असण्याची व्याख्या असते..
अल्लड वागते ती
तो समज दाखवतो,
कळतं असते तिला ते
पण तीच स्त्रीच मन असतं..
निसर्गतः पुरुष कणखर
नक्कीच असतो,
तिला तो समजतो
पण तीच मन कोमल असतं..
स्त्री च्या नाजूक भावनेत
तो जरा अलिप्त असतो,
ती स्त्री आणि तो पुरुष
हाच फरक तो असतो..
स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण..
दोघांच्यात शाररीक, भावनिक, मानसिक
फरक असतो..
दोघांना भावना आणि मन असतं,
पण स्त्री च मन कोमल व्यक्त..
तर पुरुषाच मन अव्यक्त काहीसं असतं..
निसर्गतः बदल दोघांत असतो..
त्याच्या पुरुष पणाच्या व्याख्येत तो
बरोबर असतो..
पुरुषांना पण तरल भावना जाणवतात..
मनाच्या नाजूक तारा कळतात..
मग ह्या कवितेत तिला म्हणजे स्त्रीला
भावलेला, कळलेला पुरुष शब्दबद्ध केला आहे…
© स्वाती ठोंबरे
Leave a Reply