आयुष्यात काही वेळा असे का असा आपल्याला प्रश्न पडतो पण त्याचे ऊत्तर कुणालाच ठाऊक नसते. तो आणी ती एक छान जोडी. तिला वगळून त्याचा किंवा त्याला वगळून तिचा आपण विचार सुध्दा करू शकत नाही इतके ते एकमेकांशी एकरुप झालेले असतात. तथापि आपण जर दोन्हीही व्यक्तींचा स्वतंत्रपणे अभ्यास केला तर आपल्याला आश्र्चर्य वाटल्या शिवाय रहात नाही. तो बराचसा अबोल तर तीचीअखंड बडबड चालू असते. तिला नाविन्याची हौस तर तो परंपरागत विचारसरणी असलेला. ती ऊत्तम खेळाडू तर तो फक्त एक प्रेक्षक. तिला घरगुती संसारीक दुरदर्शन मालिका बघायला आवडतात तर तो फक्त क्रिकेटची म्याच पहात बसणार.तिला घर निटनेटके ठेवायला आवडते तर तो जागोजागी पसारा करुन ठेवणार. अशा एक ना अनंत विसंगत बाजू आपल्याला पहायला मिळतात. मग प्रश्न असा पडतो कि दोघांच्या विचारसरणीत ईतकी भिन्नता असताना दोघांना एकत्रित पहाताना कोणालाच कसे विसंगत आढळून येत नाही व तो व ती एक आदर्श जोडी का वाटते. आता याचे ऊत्तर शोधत असताना असे आढळते की त्यांच्यात कितीही फरक असला तरी त्यांचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे नाते व एकमेकांवर असलेला अतूट विश्र्वास.कारण संसार हाच मुळी एकमेकावरील प्रेम व विषश्र्वासावर अवलंबून असतो व एकमेकाप्रती आदरभाव व समर्पण हिच खरी यशस्वी संसाराची गुरुकिल्ली आहे.तिला माहित आहे. की त्याला क्रिकेटची आवड आहे पण ती मुद्दाम त्याला डिवचण्यासाठी संसारी मालिका लावते. त्यालाही हे चिडवणे मनातून आवडत असते पण वरवर तो चिडल्याचा आव आणतो पण अधूनमधून चानेल बदलून तो तिच्यासह त्या घरगुती मालीकेचा आनंद घेत असतो. तीसुध्दा अधुन मधून त्याला साथ देत असते. संसारीक जिवन हे असेच असते. दोघांची विचारसरणी, आवड जरी वेगवेगळी असली तरीही एकमेकासाठी आपल्या आवडीला दोघांनी थोडीशी मुरड घातली व आपल्या सहचाऱ्याचा त्याच्या आवडी निवडीचा थोडा जरी विचार केला तरी त्यांचा संसार आनंदाने फुलून जातो. ऊलट प्रत्येकाने आपल्या मनाप्रमाणे वागायचे ठरवले तर जागोजागी आपणास एकतर विभक्त झालेली किंवा ओढूनताणून संसार चालवणारी जोडपी पहावयास मिळतील. यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करणे आवश्यक आहे तसे झाल्यास जगात सर्वत्र सुखी व आनंदी कुटुंब दिसून येतील व भारतीय संस्कृती बद्दल आपण सार्थ अभिमानाने आपल्या संस्कृतीचे महत्व जगाला पटवून देवुन आपला देश, धर्म संस्कृती याचे रक्षण करुन जगासमोर आदर्श निर्माण करण्यात यशस्वी होऊ.
सुरेश काळे
सातारा
मो.९८६०३०७७५२
दिनांक. ३ सप्टेंबर २०१८