निळ्या जळी, काष्ठी, पाषाणी,
मज मेघ:श्याम दिसे,
ऐहिक जीवनी वावरताना,
रंग निळसर भासत असे,–!!
निळा काळा शाम तो,
वाजवी मधुर बासरी,
जिथे असेन तिथे मी,
हरवून बसते परोपरी,–!!!
राधिका मी त्याची,
तो माझा कृष्णसखा,
जिथे जाईन तिथे तो,
बनत असे पाठीराखा,–!!!
नावेत बसुनी चालले ,
या तीरावरून त्या तीरी,
यमुनाही डचमळे सारखी, माझ्यासारखी उलघाल उरी,–!! मधुसूदनाचे प्रतिबिंब,
पाहते मी पाण्यात खाली,
त्यातच माझे मुख दिसे,
प्रतिमा एकरुपच झाली,–!!!
प्रवास हा प्रेममय,
ओढ त्याची विचक्षण,
हृदये दोन परंतु,
एकच आहे तनमन, –!!!
सावळ्याची होता भेट,
अद्वैताचाच साक्षात्कार,
कोण राधा,कोणता कृष्ण, जगासकोडेवाटे फार,-!!
हिमगौरी कर्वे
Leave a Reply