नवीन लेखन...

तो शेवटी पुरुषच असतो

तो शेवटी पुरुषच असतो
नवरा हे नावं असतं
सगळे नवरे इथून तिथून सारखे
तो शेवटी पुरुषच असतो
कुठे हो स्त्री किंवा बायको
पूर्णपणे स्वतंत्र असते
या युगात ही नवऱ्याच्या
कलाने स्त्री वागत असते
सासर माहेर दोन्ही नाती
स्त्रीच जास्त जपत असते
पुरुषाला इतकी नाती
सांभाळण्यात फिकीर नसते
दोन्हीकडे नाती निभावतांना
स्त्रीची होते कधी मेटाकुटी
नवरा खुशाल त्यावर म्हणतो
जमत नसेल तर सोडून दे गोष्टी
मोठेच काय छोटे निर्णय घेतांना
अजूनही काही स्त्रियांना नवऱ्याची
संमती सगळ्यात लागत असते
राग नको कुठला मग मर्जी
नवऱ्याची सांभाळावी लागते
तुला काय कळतं तुला काय समजत
हे बोलण्यात कित्येक नवऱ्याचं आयुष्य जातं
म्हातारपण येऊन सुना जावई आले तरीही
बायकोचा अपमान करण्यात आयुष्य निघतं
छोट्या छोट्या गोष्टीत नवऱ्याची
आवड निवड कितीजणींना जपावी लागते
घरात वाद भांडण नको मग
मक्तेदारी पुरुषांची खूप ठिकाणी चालते
नौकरी असली काय नसली काय
घरात तुला काय काम असते हा
ठपका कायम बोलण्यात असतो
कितीही करा घरासाठी तिचा भाव
घरातल्याना कधीच न कळत असतो
झटत असते संसारासाठी ती
कारण डाव तिचाही मांडलेला असतो
जीव लावते ती सर्वस्व ओतून संसारी
कारण खेळ तिनेही मांडलेला असतो
होता होता काळ लोटतो वेळ जाते
तिची सवय घरातल्याना झालेली असते
एक दिवस मरणं तिला बोलवून घेत
आणि ती गेल्यावर मग प्रत्येकजण रडतो
कारण ती गेल्यानंतरच तिच्या असण्याचा
भाव पाहिले नवऱ्याला अधिक कळतो
वेळ निघून जाते ती जग सोडते
पाठीमागे दुःख करण्यात काहीच नसते
तिला थोडीच कळणार असतं कोण कोण रडलं
म्हणून म्हणते ती आहे तोपर्यंतच सुख सगळ्यात असतं
— स्वाती ठोंबरे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..