हल्ली आपल्याकडे खाजगी शाळा शाळांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पालक वर्ग मुलांना खाजगी शाळेमधेच प्रवेश देत आहेत .पालक आपल्या पाल्याचे भविष्य चांगले घडावे या साठी नेहमीच प्रयत्नात असतो. तांच्या अपेक्षांना नेहमीच ह्या शाळा खऱ्या उतरतील ह्याची शाश्वती वाटत नाही. दुसरीकडे सरकारी शाळाची अवस्था अतिशय बिकट आहे. अशी एकंदरीत परिस्थिती असताना भारताचे भविष्य घडत आहे का बिघडत आहे हे सांगणे कठीण आहे.
सरकारी शाळांमध्ये शाळातील शिक्षकांची शाळेतील कामाबद्दल विचार केल्यास शिक्षकांच्या नेमणुका ह्या विद्यार्थ्याना शिकवण्यासाठी असतात हे वाटत नाही .शासन नवनवीन माहिती आढावा दररोज मागते ती माहिती पुरवण्यासाठी शाळास्तरावर लिपिकांची नेमणूक नाही . हि सर्व कामे सर्व शिक्षक मिळून केली तरी संपत नाहीत . मग शिकवन्यासाठी वेळ अपुरा पडतोय आणि शिकवयासाठीचा उत्साह शिक्षकांमध्ये राहत नाही. मुलांमध्ये शिक्षक रमत नाही .
शाळेवरील मुख्याध्यापकानाही वर्ग दिलेला असतो .तो तर चार कर्मचारयाचे काम एकटा करतो. लिपिक,टपालवाहक, वर्गशिक्षक,बँकेतील कामे ,शाळा सुटल्यानंतर शाळेची ऑनलाईन माहितीची कामे करणे.सर्वात जास्त भरडला जातोय तो मुख्याध्यापक .शाळेचा मुख्याध्यापकांची मानसिक स्थिती पार बिघडून गेली आहे . अति कामाच्या ताणामुळे त्याची झोप सुधा निट होत नाही . दुसरीकडे कार्यालयात बघितले तर लिपिक,कामे नसतात म्हणून रिकामे आहेत .इथे देशाचे भविष्य घडतेय तिथे इतर कामांचा ताण जास्त आहे ,परिणामी कितीही चांगल्या योजना आणल्या तरी त्या यशस्वी होताना दिसत नाहीत .परंतु याचा विचार कोणीही करत नाही .
प्राथमिक शाळेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लेखी व ऑनलाईन माहिती मागवू नये किंवा मग अधिकार्यांनी येऊन सदर माहिती स्वतः लिहून घेऊन जावी शिक्षक असो व मुख्याध्यापक त्यांना विध्यार्थ्यंची हजेरी व परीक्षा संबधी कामे आणि शिकवणे याशिवाय इतर कोणतेच काम अजिबातच लाऊ नये .
अधिकारयानी हि काळजी घ्यावी .ह्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे.
— WhatsApp वरुन आलेला हा लेख तुमच्यासाठी शेअर केलाय..
Leave a Reply