आजची आपल्या देशातील एकूणच शिक्षण पद्धती पाहिल्यावर शाळेत नक्की जातं कोण पालक की पाल्य तेच कळ्त नाही आणि या सर्वात शिक्षक नेमकी कोणती आणि कशी भुमिका बजावतात या बद्दल बर्याच लोकांच्या मनात प्रश्न चिन्ह निर्माण होतं. त्याला आंम्हीही अपवाद नाही.
आज इतक्या वर्षानंतरही आपल्या देशातील शिक्षण पद्धती सुधारलेय की ढासळतेय तेच कळायला काही मार्ग उरला नाही. आम्ही शाळेत असेपर्यत आमच्या पालकांचा पाय एक – दोनदाच शाळेला लागल्याच आंम्हाला आठवतय ते ही आंम्ही कोणाची खोडी वगैरे काढली म्ह्णून नाही तर शाळेची फी भरायला उशीर झाला म्ह्णून. आमच्या पालकांनी आंम्हाला शाळेत काय गृह्पाठ दिलाय हा प्रश्न कधीच विचारला नाही त्याला कदाचित त्यांच झालेल अल्प शिक्षण कारणीभूत असेलही मग आमच्यासाठी त्यांनी निबंध लिह्ण्याची अपेक्षा करण म्ह्णजे दिवाळ्स्वप्न पाह्ण्यासारख होत. त्यावेळी आमच्या घरातच नव्हे तर आमच्या संपूर्ण झोपडपट्टीतही आमच्या पेक्षा वयान जास्त आणि हुशार कोणी नव्ह्ताच. याबाबतीत आंम्हाला स्वावलंबी होण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्ह्ता. आमच्या वर्गात आमचा दहाच्या आतच नंबर येत असल्यामुळे आंम्ही बर्यापैकी हुशार होतो त्यामुळे मला हे जमल नाही, मला हे जमत नाही अस म्ह्णायला वावच नव्ह्ता. निबंधाच पुस्तक विकत घ्यायला आंम्हाला कधी जमलच नाही. कोणाचा निबंध पाहून आमच्या वहीत तो आंम्ही कधीच उतरवला नाही. कोणत्याही विषयावर आणि आंम्हाला येत असणार्या कोणत्याही भाषेत आंम्ही सह्ज निबंध लिहायचो. शाळेत असेपर्यत दोनशे- तिनशे निबंध लिह्ले असतील ते जर जपून ठेवले असते तर आज मला एक निबंधाच पुस्तकच प्रकाशित करण शक्य झाल असत . असो शाळेत असताना आमच्या निबंधाला एक ही बक्षीस मिळाल नाही कारण आमच्या शिक्षकांनी आमचा हा निबंध लिह्ण्याचा गुण कधी हेरलाच नाही. मी इतरांसाठी लिह्लेल्या निबंधाना अगदी राज्यस्तरीय स्पर्धेमध्येही पहिल बक्षीस मिळालं होत. माझ्या निबंधाला तिसरा नंबर मिळ्वण या बाबतीत कधी जमलच नाही. आता काल पर्वाच माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीला शाळेत घेतलेल्या निबंधस्पर्धेत पहिल बक्षीस मिळाल. अर्थात तो निबंधही मीच लिहला होता…आमच्यातील मैत्रीखातर…
आता मला प्रश्न पडतो आजचे विद्यार्थी निबंध स्वतःच्या मनाने लिहायला कधी शिकणार की शिकणारच नाहीत आणि शिकलेच नाहीत तर त्यांच्यातील लेखक कस घडणार ? आमची चित्रकला थोडी बरी, ह्स्तकला उत्तम आणि त्यात अभियांत्रिकी ज्ञान आणि कल्पकता आमच्यात ठासून भरलेली. शाळेत कोणाला कशापासून काहीही तयार करायला सांगितले तर आंम्ही ते कसेही तयार करणार याची सर्व म्ह्णजे माझ्या जवळ्च्या शाळेत जाणार्या पाल्यांच्या पालकांना खात्री होती. त्यामुळे आजही आमच्या समोर बरेच पालक रांगेत उभे असतात तेंव्हा आता मलाच एक प्रश्न सतत सतावतो तो म्ह्णजे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनाही तयार करायला जमणार नाही असे प्रकल्प शिक्षक विद्यार्थ्यांना तयार करायला देतातच का आणि देतात तर ते स्वतःच्या मार्गदर्शनाखालीच का तयार करून घेत नाहीत. पालक आपली निबंध लिह्ण्याची जबाबदारी झटकण्यासाठी पाल्याला निबंधाची पुस्तके विकत आणून देतात नाहीतर इंटारनेटची मदत घ्यायला सांगतात. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांमधील कल्पकता कमी होतेय काही प्रमाणात. शाळेत तयार करायला सांगितलेले काही प्रकल्प तर इतके अवघड असतात की ते तयार करण ते तयार करायला सांगणार्या शिक्षकालाही तयार करण जमेल की नाही याबद्दल शंका निर्माण व्हावी . मग अशा वेळी पालक आपल्या डोक्याला हात लावून बसत असतील तर ! ते आपल्या शिक्षणपद्धतीचच दुर्दैव म्ह्णावं लागेल नाही का ?
— निलेश बामणे
Leave a Reply