MENU
नवीन लेखन...

दातांच्या स्वच्छतेसाठी ‘टूथपेस्ट’

तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते का? असे प्रश्न विचारत दूरदर्शनवर अनेक टूथपेस्टची जाहिरात होत असते. या टूथपेस्टमध्ये नक्की असते तरी काय? दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यासाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले, बिनविषारी व रुचिहीन आणि बारीक कण असलेले पदार्थ टूथपेस्टमध्ये वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम सल्फेट, सजल अल्युमिना, पोटॅशियम टाटरेिट, बेंटोनाइट इत्यादी न विरघळणारे अनेक पदार्थ यासाठी वापरतात. या पदार्थांमुळे बऱ्याच वेळा टूथपेस्टला आम्लता किंवा क्षारता (अल्कलिनिटी) येते. टूथपेस्ट आम्लधर्मी असेल, तर तोंडाला जास्त लाळ सुटते व क्षारधर्मी असेल तर अन्नकण कुजून तयार झालेल्या आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया होते. उदा. कॅल्शियम फॉस्फेटने आम्लता व पोटॅशियम टाटरिटाने क्षारता येते.

टूथपेस्ट दातांच्या फटींमध्ये पोहचावी म्हणून त्यात प्रक्षालकाचा (मळलेला पृष्ठभाग स्वच्छ करणारा पदार्थ) वापर करतात. सोडियम लॉरिल सल्फेटचा वापर प्रक्षालक म्हणून केला जातो. कॅल्शियम व मॅग्नेशियम परबोरेट किंवा मॅग्नेशियम पेरॉक्साइड यांचाही अंतर्भाव टूथपेस्टमध्ये असतो. या रासायनिक पदार्थांचे अपघटन होऊन ऑक्सिजन बाहेर पडतो आणि त्यामुळे जंतुनाश होतो आणि तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते.

याशिवाय मेंथॉल, थायमॉल, यूजेनॉल, मिथिल सॅलिसीलेट इ. सुगंधी द्रव्ये टूथपेस्टमध्ये घालतात. त्यामुळे उत्साहवर्धक स्वाद निर्माण होतो व टूथपेस्टमध्ये एखादे उग्र वासाचे द्रव्य असल्यास त्याचा वास झाकला जातो. ही द्रव्ये काही प्रमाणात जंतुनाशकही आहेत.

काही टूथपेस्टमध्ये फ्लोराईडचा समावेश असतो. फ्लोराईडमुळे दातात कॅव्हिटी (कीड लागण्यास) होण्यास प्रतिबंध होतो. लेमन, मिंट अशा वेगवेगळ्या स्वादामध्ये टूथपेस्ट उपलब्ध असतात. बहुतेक वेळा मिंट फ्लेवरचा उपयोग मुख्यतः केलेला असतो. मुलांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॉबेरी, बबलगम या फ्लेवरचा उपयोग करतात. हे फ्लेवर आइसोअमाईल अॅसिटेट आणि इथाईल, मिथाईल, फिनाईल, ग्लाइसिडेट या रसायनांमुळे येतात. टूथपेस्टला असणारा गोडवा सोडियम सॅकरीन किंवा सॉरबिटॉल सॅकरीनमुळे येतो. मीठ म्हणजेच सोडिअम क्लोराईडचा वापर जिवाणूरोधक म्हणून केला जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..