नवीन लेखन...

पर्यटन आणि आरोग्य

पर्यटन प्रवास प्रवास कशासाठी असे विचारले तर पहिले उत्तर कायाकल्प – Rejuvination असेच असेल. रोजच्या कष्टमय कंटाळवाण्या नित्यक्रमातील हा रम्य काळ.

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ह्या पर्यटनामुळे प्राप्त अमूल्य भेटी होय ! आता हेच पहा ना! ‘प्रवासाला जायचे’ हा नुसता विचार आपल्याला रोमांचित करतो.

आपण सर्व जाणता की उत्तम सकस आहार, अर्धशक्ती व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैली/ सकारात्मक बदल आपल्याला उत्तम आयुष्य – आरोग्य देऊ शकते. मात्र प्रवास/ पर्यटन आपल्या हृदयाला बल प्राप्त करून देते हे माहीत होते का?

A Joint study from the Global Commission on aging and Transamerica Center for Retirement Studies and the U.S. Travel association concluded that women who vacation at least twice per year significantly lowered their risk of a heart attack when compared to those who traveled only once every six years. The same study also concluded that men who don’t take vacations at least once a year increased their risk of heart disease by 30% and their risk of death by 20%.

World Heart Federation असे मत आहे की, प्रवास दरम्यान घडणारा असा मध्यम दर्जाचा व्यायाम हृदयविकाराचा झटक्याचे प्रमाण ३०% ते ५०% पर्यंत कमी करतात. त्यामुळे सहलीला जाऊन तुम्ही हृदयाचे आरोग्य सुधारता आणि स्वतःचे आयुष्यसुद्धा.

असा व्यायाम वजन उतरवण्यास सहाय्यभूत ठरतो. त्यात सुद्धा वन्य जीवन पर्यटन, गिर्यारोहण, जलीय खेळ, साहस पर्यटन यांचा विशेष फायदा होतो. आनंद आणि हलकेपणा जाणवू लागतो.

प्रवासादरम्यान सूर्यनारायण आपल्याला अधिक लाभ देतात. सूर्य किरणांनी Vitamin D चे संश्लेषण होऊन शरीरातील हाडे बळकट होण्यास मदत होते.

हृदयाप्रमाणे मेंदू देखील पर्यटनाने समृद्ध होते. असे म्हणतात की, मेंदूतील hippocampi भाग वय जसे वाढते तसे आकुंचित होऊ लागतो. Hippocampi भाग माहिती संग्रहणाचे कार्य करतो. त्या भागाचे संकुचन संग्रहणाची शक्ती कमी करतो. मात्र प्रवासामुळे hippocampi भाग वाढू लागतो आणि आपली संग्रहणाची शक्तीसुद्धा वाढते. माणसाचे आयुष्य स्मृती-आठवणींशिवाय काय आहे? हीच इहलोकातली शिदोरी. त्यामुळे प्रवास महत्त्वाचा !

प्रवास अशाही काही देशांचा केला जातो जेथे आरोग्य-अनारोग्यासाठी काही चिकित्सा प्रणाली प्रचलित आहे. उदा. उष्ण पाण्याचे नैसर्गिक कुंड, तुर्की. त्यामुळे चर्म रोग बरे होतात असे सांगितले जाते. मेडिकल आणि वेलनेस टुरिझम आपण पुढे पाहणार आहोतच. असा प्रवास आरोग्यदायी म्हणावा लागेल. पर्यटनाचा अजून वेगळा आनंद म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारणे.

नव्या वातावरणाची – खाद्यपेयांची आपल्या शरीराला सवय नसल्याने काही अनारोग्याच्या तक्रारी संभवू शकतात. योग्य उपचाराने ते बरे देखील होतात. मात्र त्यासोबत नवीन Antibodies शरीराला लाभतात ज्या आपली प्रतिकारशक्ती सुधारतात. एकार्थाने ते लाभदायक आहे पण त्याचा अर्थ आपण आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर असावे असे अजिबात नाही. योग्य ती खबरदारी-दक्षता आपण घेणे अनिवार्य आहे.

पर्यटनाला जाण्यापूर्वी आपल्या आरोग्य सल्लागार/ डॉक्टर यांना अवश्य भेटावे. आपण जाणार असलेल्या ठिकाणाबद्दल सांगून तत्सबंधी आजार आणि उपचार -औषधे जाणून घ्यावी. आपल्या नेहमीच्या औषधांबरोबर यांचा ही समावेश आपल्या सूचित करावा.

काही पर्यटन स्थळांच्या संभावित आजारांसाठी लसीकरण घेणे हितावह ठरते.

खालील पैकी लसी घेण्याचा सल्ला पर्यटन विभाग सुद्धा देते.

Hepatitis -A
Hepatitis B
Typhoid and paratyphoid fever
Meningococcal disease
Yellow Fever
Rabies
Japanese Encephalitis

आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका जाणाऱ्या पर्यटकांना/ बिझनेस ट्रॅव्हल करणाऱ्यांना Yellow fever चे लसीकरण अनिवार्य आहे. तसेच मक्काला हजसाठी जाणारे तीर्थार्थी यांना Meningococcal Vaccine घ्यावे असा सल्ला असतो.

पर्यटनाचा सगळ्यात मोठा फायदा हा ताण थकवा कमी करण्यास होतो. पर्यटन आपल्यामध्ये नवचैतन्य-उत्साह-ऊर्जा देते, जी आपल्याला पुढच्या आयुष्यासाठीचे आवश्यक प्रोत्साहन असते. हे प्रोत्साहन फक्त कार्यकर्तृत्वात वाढ नाही करत तर आपल्या आयुष्याला आनंदाची अधिक वर्षे प्रदान करते.

तेव्हा पर्यटन ‘उत्तम आरोग्यासाठी नक्की करावे.

-डॉ. अनुप्रिता नाईक-देशपांडे

(व्यास क्रिएशन्स च्या पर्यटन दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..