कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी सायंकाळी त्रिपुर पाजळवितात. त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा भगवान शिवानी वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा होय. या कथेत काही ठिकाणी मतभेद आहेत. या दिवशी त्रिपुर लावले जातात. म्हणजेच दीपोत्सव साजरा करतात त्यावेळी जो मुख्य मंत्र म्हणतात त्याचा अर्थ असा – जो कोणी हे त्रिपुर पाहिल तो मुक्त होईल आणि उत्तम योनीत जन्म घेईल.
या दिवशी कृत्तिका नक्षत्र असता कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्यास सांगितले आहे. यांचे या वेळी दर्शन घेतल्यास धन-धान्य, शौर्य, वीर्य, धैर्य वगैरे मध्ये वृद्धी होते असे सांगितले आहे.
Leave a Reply