नवीन लेखन...

पं. त्र्यंबकराव जानोरीकर

भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांचा जन्म १३ जुन १९२१ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्ये व रत्नागिरीत संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.

पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँ यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अंजनी मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले. पं. जानोरीकरांनी भारतभर आपले कार्यक्रम केले, तसेच संगीताचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीलाही त्यांनी तयार केले. १९६० ते ७०च्या दशकात ही विशिष्ट गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रियही केली. कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत १९८९ च्या नोव्हेंबरापासून इ.स. १९९१ च्या जूनपर्यंत त्यांनी संगीत गुरू म्हणून काम पाहिले. त्यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी सप्रात्यक्षिक व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते.

जानोरीकर बुवांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये हिंदू देवी-देवतांची सुरेख वर्णने आढळतात. पंडित जानोरीकरांनी अनेक शिष्य तयार केले. डॉ. साधना जोशी, डॉ. सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांच्या शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका आहेत. पं.त्र्यंबकराव जानोरीकर यांचे २३ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..