दोन दिवसांपूर्वी गांवाकडे आलोय सिंधुदुर्गात..सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप यायची नाही येवढी छान थंड हवा..!
काल घरातील सर्वांना घेऊन बहुचर्चित मालवण, तारकरली, देवबागला गेलो होतो..माझ्यासारख्या कोकणी माणसाला समुद्राचं कौतुक ते काय? परंतू देवबागच्या समुद्रकिनाऱ्यावरील ‘त्सुनामी आयलंड’ बघण्याची उत्सुकता होती..
‘त्सुनामी आयलंड’ हा एक निसर्गाचा चमत्कार आहे..या बेटाच्या निर्मितीमागे काही शास्त्रीय कारणं असतील परंतू मला वैज्ञानिकीय शास्त्रीय कारणांमध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही..कोणत्याही गोष्टीमागील कारणांच अॅनासिसिस केलं की त्यातला रोमॅंटीसीझम संपलाच समजायचं..
हे आयलंड सभेवार पाणी आणि मध्येच जमिन अशा नेहेमीच्या प्रकारापेक्षा थोडं वेगळं आहे..इथं सभावार पाणी आणि मध्येही पाणीच असा काहीसा प्रकार आहे..फरक येवढाच की सभोवतालच्या पाण्याचा ड्राफ्ट (खोली) २० फुटाचा असेल तर आयलंडवरच्या पाण्याची खोली ओहोटीच्या वेळेस जेमतेम दोन-तीन फुट तर भरतीच्या वेळेस चार-पाच फुट असते..म्हणजे ऐन भरतीच्या वेळेस या ठिकाणी गेलो असता समोरून पाहीलं असता माणूस भर समुद्रात (खरंतर ही खाडी आहे) पाण्यात गुडघाभर पाण्यातच उभा आहे असंच दिसतं..ओहोटीच्या वेळेस मध्यास मात्र थोडी पुळण जमिन, तिही फारतर अर्धा स्क्वेअर किमिची असेल, दिसते..इथ काही स्टाॅल्सही आहे मात्र ते मताणासारखे बांबूंच्या उंच प्लॅटफाॅर्मवर उभारलेले आहेत कारण खाली पाणीच असतं..इथं संध्याकाळनंतर कोणालाही थांबता येत नाही..
या आयलंडला देवबागच्या किनाऱ्यावरून बोटीने जावं लागतं..या सोयी उत्तम व किफायतशीरही आहेत..हा आयलंड तसा फार पुर्वीपासून या ठिकाणी आहे..स्थानिक लोक या बेटाला ‘भाट’ असं म्हणायचे. मात्र २००८ साली आलेल्या त्सुनामीमुळे या बेटाच्या रचनेत थोडा बदल झाला आहे..हे बेट आता थोडं थोडं समुद्रात बुडत चाललंय असं स्थनिकांची माहिती आहे..सध्या इथं अनेकप्रकारचे वाॅटर स्पोर्ट्स चालतात..तारकर्लीला जाणाऱ्यांनी या अनेख्या ‘त्सुनामी आयलॅड’ला जरूर भेट द्यावी..
आपल्याला या आयलंडचा अंदाज येण्यासाठी सोबत फोटोही पाठवतोय.
— गणेश साळुंखे
Leave a Reply