आमचे नितीन नांदगावकर साहेब आजवर सदैव अन्यायाशी लढा देत आले आहेत. त्यांचे कार्यकर्तृत्व मोठे आहे दिवसेंदिवस ते वाढत चालले आहे . त्यांच्यावर केलेली एक कविता—-
तू ज्याचा त्याचा कर्दनकाळ, अन्यायातला पाठीराखा,
काय म्हणावे तुला तेजा,
तुझ्यासम,– या सम हा-!!!
जनता जनार्दन भक्त होता,
तुला पाठिंबा सकलांचा,
दोस्त तू रंजल्या-गांजल्या,
जुलमीना दाखवीत बडगा,–!!!
दिप्त प्रदीप्त होशी,
अन्याया समोर पाहुनी,
सलाम मराठी अस्मितेला,
विरोधात कार्यवाही करशी,–!!!
निर्भिड निडर धच्चोट काम, जसे उधळत यावे तूफान,
समोर कोणीही उभे न राहती
ते पुरुषार्थाचेच काम,–!!!
स्त्रीला संरक्षण तुझे,
गरीब, गरजू बनती समाधानी, दुःखितांचे अश्रू पुसत,
प्रेषित तू अंतर्यामी,–!!!
फणसांगत वाटशी तू ,
वरून किती काटेरी दिसतो, काळीज तुझे, गोड गरा, अनुभवणारा चक्रावतो,–!!!
मदतीचा हात तुझा,
चटकन पुढे येतो,
व्यथितांना देत दिलासा,
अत्याचारा नाहीसा करतो,-!!!
अगतिक हतबल ते,
तुला शोधीत येती,—
रुपात तुझ्या मग सारे,
प्रत्यक्ष भगवंत बघती,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply