झोपेतून उठताच बाबा बाबा करी
हाती माझ्या आहे तुझ्या पाळण्याची दोरी
रडू नको बाळा तुला देतो मी झुला
आभाळाच्या उंची वरी नेतो मी तुला
तेथूनच बाबा ला तू न्याहाळत रहा
हाता मध्ये आहे त्याच्या खेळणी पहा….
ना ना ना ना ना ना…. ना ना ना ना ना ना….
उगी उगी बाळा आता थांब ना तू जरा
वाटी मध्ये आणतो मी दूध आणि शिरा
तुझ्यासाठी बाबा घोडा बनून धावेल
पाठीवर तुला त्याच्या रोज खेळ वेल
दुडू दुडू तुझ्या संगे धावत तो जाईल
ठेच लागताच तुला सावरून घेईल….
ना ना ना ना ना ना…. ना ना ना ना ना ना….
आता गेलो आहे पोरी पुरता थकून
कुठून मी आणू तुझ्या आई ला शोधून
गेली आहे देवा घरी दूर तुझी आई
कधीच मी तिला आणू शकणार नाही
आठवण येता तिची रडू नको बाई
तुझ्या साठी आहे मीच बाबा आणि आई.….
ना ना ना ना ना ना…. ना ना ना ना ना ना….
कवी :भैय्यानंद वसंत बागुल
Leave a Reply