तुझ्यात, मीच कधी गुंतलो
आज मलाच आठवत नाही
पण श्वासातला गंधाळ तुझा
दरवळणे कधीच थांबले नाही
तू कस्तूरी, तू बकुळी सुगंधा
तुज मी कधीच भुललो नाही
चराचरातुनी, तुझीच सुरावट
गुंजारवी गुणगुण संपली नाही
जिथे, तिथे सारेच भास तुझे
स्मृतीगंघ कधीच विरला नाही
भेटलो तू अन मी ज्या राऊळी
ती दीपमाळ मी विसरलो नाही
दान, अमरत्वाचे सत्यप्रीतीला
याचे विस्मरण कधी झाले नाही
लोचनी विलसलेले ते रूप तुझे
मी कधीच विसरु शकलो नाही
आजही तुझ्याच स्मरणात जगतो
त्याविण जीवा दूजी शांतता नाही
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १३१.
७ – ५ – २०२२.
Leave a Reply