तूंच गे , अंतरीची कविता
सुगंधा , तूच गे मनसुंदरा
प्रीतफुल , बकुळ लाघवी
जगविते , माझिया अंतरा।।
तूं रंभा , उर्वशी , मेनका
भूलोकीची या स्वर्गसुंदरा
तूच गे स्वर , शब्दचांदणे
प्रतिभा ! तूच गे भावसुंदरा।।
तुझ्यासंगे , शब्द उमलती
भावनांचेच ! घन आभाळी
मिठीत घेता , मी सारेसारे
तृप्तीत ! तेवतो मनगाभारा.।।
शब्दगंधले तव रूप आगळे
दीपवुनी जाते , तनामनाला
हृद्य प्रसवते मनीची कवीता
मग झरझरतो ! ब्रह्मांड सारा।।
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३.
१३ – १ – २०२२.
Leave a Reply