तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,भासते ही रीत आगळी
उमजत नाही काय करावे,तुझीच असतां सृष्टी सगळी
वाहणाऱ्या संथ नदीतील,पाणी घेऊन अर्घ्य देतो
सुंदर फुले निसर्गातील,गोळा करुन चरणी अर्पितो
अन्न ग्रहण करण्यापूर्वी,नैवेद्य तुजला दाखवितो
जगण्याचा तो मार्ग दोखवी,ह्याचीच पोंच आम्ही देतो
विचार ठेवूनी पदोपदीं,साऱ्यांचा तूं असशी मालक
दुजास देण्यातील आनंद,हाच मिळवित असे एक
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply