तुझ्या मिठीत मी
अलवार गंधाळून गेले,
बंध मलमली सारे हे
भास तुझा अंतरी असा रे..
घेता तू घट्ट मिठीत मग
चांदणे नभात चमचमे,
सैलावेल गात्रे तुझ्यात माझी
हलकेच समर्पित मी होता रे..
स्पर्श तू अलगद करता
जाईल मी मोहरुन रे,
ओठ तू अलवार टिपता
गोड होईल साखर चुंबन रे..
अत्तराचा गंध केतकी
काया अधर जरा बहरते,
विरघळते मी तुझ्यात अशी
गुलाबी पहाट तेव्हा होते..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply