तुझ्या मिठीत सख्या
मी बेधुंद जराशी व्हावी
स्पंदने हलकेच अधरी
अंतरात उलघाल व्हावी
घेशील मज तू कवेत जेव्हा
चांदण सडा अंगणी बरसला
लाजेल मी अलगद गाली तेव्हा
तू ही सख्या हलकेच मोहरला
स्पर्शीले तन आल्हाद तू
बहरल्या रोमांचित खुणा
ओठ ओठांनी टिपले तू
साखर चुंबनाचा गुलाबी गोडवा
अलवार मिठीत तुझ्या
वेढून घे अलगद तू मजला
स्पर्श मलमली गुंतून मोहक
मखमली उरतील भावस्पर्शी खुणा
नकोच शब्द तेव्हा काही
शहारे तन पुन्हा पुन्हा
सोडून येते मी वाट वेगळी
गंधाळते मी तुझ्यात तेव्हा
वाट तुझी पाहता सख्या
चंद्र टिपूर आकाशी सजला
तारकांच्या नभांगणात रंगला
दोन मनाचा गंधित अत्तरी केवडा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply