तुका…..!
युगे युगे गुलामगिरीत जगलेल्या,
अन माणसालाच जनावर बनवुन,
त्यांच्यावर अंमल करणार्या,
वर्णवादी व्यवस्थेवर आसुड ओढुन,
तु तुझ्या अभंग ओव्यांनी,
येथील भुमिपुत्रांच्या मेंदुवरील,
जळमट पाश काढुन,
तु माणसाला माणसात आणलं…!
गारूड केलं तुझ्या ओव्यांनी,
ईथल्या जनसामान्यावर…!
झाडा पाखरांत रमणारा तु,
आडाणी देवभोळ्या समाजाचे शोषण बघुन व्यथीत झाला,
आणि त्यांच्या देवालाच,
आव्हाण देऊ लागलास,
तेंव्हा मात्र हादरली ईथली व्यवस्था,
अन व्यवस्थेचे रखवालदार…!
मग मात्र त्यांनी,
यावर नामी उपाय काढला,
बुडवली तुझी गाथा,लेखनी,
इंद्रायणीच्या पाण्यात,
अन साक्षात तुलाही….!
अन उडवली हाळी तु सदेही
वैकुंठाला गेल्याची…!
पण त्यांना नव्हत माहीत की,
ईथल्या मातीत तु पेरलेलं बीज,
जस ईथं रूजलं ना तसच,
इंद्रायणीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबरच
तुझी गाथा घरोघरी अन,
ओठा ओठांवर पोचलीय म्हणुन,
तुझ्या ज्ञानाच्या सागरात,
विलीन होऊन….!
©गोडाती बबनराव काळे,लातुर
9405807079
Leave a Reply