तुला जमलं नाही सहज
नाजूक भावनांना फुलवणे
जमलं फक्त तुला सहज
रागाने अवचित मला बोलणे..
मिठीतल्या गोड भावना
तुला कळल्या नाही
रागाच्या बोलण्यावर तुला
दुसरं काही दिसलं नाही..
तुला सोडवता आला नाही
मधुर नाजूक मनाचा गुंता
मला मात्र मिळाला अलगद
वेदनेचा काटेरी ओला कोपरा..
हवे तेव्हा मी समीप हवे तेव्हा लांब
तुला सगळं सहज सार हे जमलं
मनाचा विचार न करता तुला
ब्लॉक करणं ही हलकेच जमलं..
भावनासाहित मात्रेचा गंध
तुला कळला कधीच नाही
नाजूक गुंता झाला मोहाचा
कोष हा गुंतलेला तुला सुटला नाही..
हवे तेव्हा बोलून तोडले
हवे तेव्हा रागाचे शब्द दिले
अलवार तरल हळुवार अर्थांचे
शब्द तुला न कधी समजले..
झटकून टाकावे झटक्यात
तसे तू दूर दूर झटकले
दुःख एकच उरले अंतरी
घाव वर्मी नाहक मिळाले..
गोड नाजूक भावनांची
ओढ तुला कळली नाही
वेदना मिळाल्या बोलून
तरी वीण तुला कळली नाही..
खेळच झाला भावनांचा
मनही तुला कळले नाही
सगळे खोटे वाटले तुला
मोहक गुंतणे तुला कळले नाही..
शांत ओढ प्रीत सरितेची
सागरास न खुणा कळल्या
केशरी सांज सरणारी मधुर
बंध मोहक तू अलवार तोडला..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply