।।गजकर्णकाय नम: तुलसीपत्रं समर्पयामि।।
“मै तुलसी तेरे आंगन की”हे गाणे बऱ्याच जणांना माहीत असेल माझ्या माहीती प्रमाणे हा एक जुना चित्रपट होता.असो थोडक्यात काय हिंदू संस्कृतीत आणी आपल्या आयुर्वेदामध्ये ह्या वनस्पतीला अत्यंत मानाचे स्थान आहे.
आज आपण पहातो बऱ्याच घरांमध्ये तुळशी वृंदावन असते किंवा घरा भोवताली तुळशीचे कुंपण लावतात.कारण तुळस हि रक्षोघ्न आहे अर्थात वाईट शक्ती रोग राई आपल्या घरापासून लांब ठेवते.
सकाळी उठून स्त्रिया शुचिर्भुत होऊन तुलसीला प्रदक्षिणा घालून तिला पाणी वाहतात कारण तुळशीच्या भोवताली प्राण वायू हा अगदी शुद्ध असतो व तिच्या सान्निंध्यात राहील्याने आपले आरोग्य चांगले राहते म्हणूनच कि.किती सोपा व सुंदर उपाय आपल्या संस्कृती मध्ये दिला आहे ना.
तुळसीचे क्षुप हे ०.५-१.५ मी उंच असते व हे वर्षायू असते.हिचे दोन प्रकार आढळतात एक कृष्ण तुळस जी काळसर तांबूस असते व एक श्वेत तुळस जी हिरवीगार असते.ह्याची पाने १-२ सेंमी लांब असून विशिंष्ट तीक्ष्ण सुगंध युक्त असतात.पानाच्या मादीस बाजूस सिरांमध्ये बारीक तैलग्रंथी असतात.फुले तांबूस काळसर असून मंजीरी १२-१७ सेंमी लांब असते.बी लहान,गोल,चपटे,तांबूस धुरकट असते.हिवाळ्यात ह्याला फुले व फळे येतात.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात:
ह्याची चव तिखट,कडवट असते,ही उष्ण गुणाची असून हल्की,स्निग्ध व तीक्ष्ण असते.तुळशीच्या बिया मात्र गोड,थंड,स्निग्ध व पिच्छील असतात.
हि कफवात शामक व पित्तवर्धक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग जाणून घेऊ:
त्वचा रोग,सूज ह्यात पानांचा रस/ लेप लावतात.
हिरड्या मधून पु येत असल्यास तुळशीची पाने चघळावी.
संडास मधून आव पडत असल्यास तुळशीच्याबियांची खीर उपयुक्त आहे.
श्वसनविकारांमध्ये तुळस उत्कृष्ट काम करते म्हणूनच खोकला,दमा,उचकी,सर्दी ह्यात तुळशीचा रस मधा सोबत देतात.
तापामध्ये तुळशीचा रस हा मध व मिरीपूड ह्या सोबत दिला जातो.
तुळशीच्या बिया ह्या पुरुषांमध्ये वीर्यवर्धन करायला उपयुक्त असतात.
तुळस ही डास व किटकांचा नाश करते म्हणून अंगणात ह्याचे कुंपण घराभोवताली लावावे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply