नवीन लेखन...

तुम न जाने किस जहां मे खो गयें..

जीवनाच्या अनेक संचिता पैकी लताचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवती भोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्वें असतात, स्वर असतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं. मोठ्या माणसांच असणं डोक्यावर छत्र असतं. लतांची गाणी अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहे, जिच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखद आहे. सौंदर्य आणि स्वर आपल्या आवाक्यात जरी नसले तरी पाहण्यात व ऐकण्यात ते आपलेच असतात. लताच्या गाण्यामुळे अनेक गाण्यांना परिसस्पर्श लाभला. लता  गाण्याला सोनं करणारं परीस आहे.  प्रेमाला उपमा नाही तशी लताच्या गाण्याला उपमा नाही.

लताचे स्वर ऐकल्यावर असं वाटतं, जीवनात ही घडी अशीच राहू दे. माणसें येतात आणि जातात पण स्वर मनात घर करतात.  मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. लता कुठे काय करते? लता केवळ आधारच देत नाही तर वेळू गगनावर नेते. काही सौंदर्या साठी व काही स्वरा साठी सगळी विशेषणे थिटी पडतात, तिथे शब्दांच्या पलीकडे गेल्यानंतरच सौंदर्य आणि स्वर कळतात. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असतें, काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. लताचे स्वर या प्रकारात मोडतात. मोडक्या तोडक्या आणि भग्न आयुष्याला अर्थ प्राप्त करून दिला तो लतांच्या मधुर स्वर आणि गाण्यांनी. लतांच्या गाण्यांनी अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे. माणसे रडल्याशिवाय मोकळी होत नाहीत.our sweetest songs are those that tells us the saddest thoughts. मैफल मध्ये भाव खाते ती असतें गझल. लताच्या गाण्याचं ही असच आहे.

माणसें जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर स्वरही मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, स्वरांना मरण नसतं. आकाशातल्या तारका जशा मोजता येत नाही तसं लताच्या गाण्यांचं अस्तित्व मोजता येत नाही. आकाशातल्या नक्षत्रांचे देणं नुसतं अनुभवत राहावं तशाप्रकारे लतांच्या गाण्यांचा अनुभव नुसता घेत राहावा आणि यातच जीवनाची खरीखुरी इतिकर्तव्यता आहे. गाण्यात अर्थ असतो पण गाण्याला सुगंध असतो हे लताची गाणे ऐकल्यावर जाणवतं. अश्रूंची फुले करण्याची किमया लतांच्या गाण्यात आहे. आपलं संचित आपल्यालाच माहित नसतं. आपलं संचित माहिती होण्यासाठी किंचित वेळ द्यावाच लागतो.लतचा काळजाला भिडणारा,हेलावून सोडणारा, अंतर्मुख करणारा, डोळ्यातून अश्रू वाहायला लावणारा आवाज, हीच लताची शक्‍ती आहे.लता व्याख्येत न मावणारी स्वरसम्राज्ञी आहे.लता काहीजणांचे दैवत,अनेकांच्या भिंतीवरील फोटो प्रेम आहे. मनाच्या चौकटीतील एक सुंदर चित्र आहे .एकच गीत अनेक जण गातात, पण हसवायचे, रडवण्याचे सामर्थ्य काही जणांमध्ये असतं,  त्यापैकी एक लता.लता असे चुंबक आहे,जिथे सर्व विशेषणे आपोआप चिकटतात.

गाणं अजरामर करणं लताडून शिकायला हवं. ये मेरे वतन के लोगो ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं. पंडित नेहरूंच्या डोळ्यात व आमच्या डोळ्यात पाणी आणलं ते लतानीच

सुखामध्ये जीवनात ही घडी अशीच राहु दे  असंवाटतं. हे क्षण असेच पकडून ठेवावेत, त्याला दृष्ट लागू नये असं आपल्याला वाटतं.ऊत्तुंग प्रतिभेच्या आविष्काराला  साथ देणारा आवाज  हवा. गीत आणि सूर हातात हात घालूनच जायला हवेत, तरंच मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा हे शक्य आहे.

लतांनी प्रेमिकांच्या आयुष्यात बहार आणली आहे . लहान मुलांना नाचायला शिकवले. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आई मी पावसात जाऊ कां? जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून, वृद्धांना संध्याछायेची आठवण करून दिली आहे .एक-दोन-तीन-चार या जावेदच्या मासिक बाराखडीच्या गाण्याला लतांनी रंगत आणली. काही गाणी लतांमुळे लक्षात राहतात. मोगरा फुलला ,चाफा बोलेना, ही गाणी जणू तुमच्यासाठीच होती. आपली नक्कल करू नये, म्हणत लतानी सृजनाचा मार्ग मोकळा ठेवला आहे. अनेक लता आहेत,अनेक आशा आहेत, हवाय फक्त आधार. भीक मागणाऱ्या सुरांना जेव्हा आधार मिळतो, तेव्हा त्याला राजमान्यता मिळते, त्याच सोनं होतं.अशा अनेक रानुमंडलआहेत.

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया गेला बाबा हे खरंच ठरलंय. मंगेशकर घराण्याची लता, तिचा वेलू गगनाला भिडतोय. मंगेशकर घराण्याने सुरांचा  उष:काल करत आशा पल्लवित केल्या आहेत.लतानें आमच्या सर्वांच्या जीवन जगण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

लताच्या सुरमयी आवाजाने  आमचे  जीवन सुरमयी झाले आहे.

सुखं म्हणजे नक्की  काय असतं,लतांचं मधुर गाणं ऐकणं असतं.

सूर तेची छेडीता, गीत उमटें लताचेंच  हे पदोपदी जाणवते. लताची गाणी मुदतीची ठेवं आहे. सुरांचे व्याज देणारी, मानवी जीवन समृद्ध करणारी लताच्या मधुर, दर्दभऱ्या गाण्यांनी  जीवनात आशा पल्लवित केल्या आहेत. अनेकांची दुःख सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे. अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे. वास्तवाची जांण करून दिली आहे.लताच्या गाण्यांनी, अनेकांनी आपल्या प्रेमाची सुरुवात केली,आपल प्रेम फुलविले,जीवन फुलवले.अनेक गाण्यांनी हसवले,रडवले,डोळे पाणावले आहेत.धीर दिलाय. असेच वास्तव एका गाण्यात  सांगितले आहे, जे मला भावलं. डोळ्याच्या कडा ओलवणारं एक गीत.जन पळभर म्हणतील हाय हाय… मृत्यू हा प्रत्येकाला येणारच, तो अटळ आहे मग अशा मृत्यू कडे पाहण्याचा दृष्टिकोन कवी भा. रा. तांबे यांच्या गीतांनी व लता च्या सुरांनी सुसह्य होतं. आपण मृत्यूला घाबरतो,पण काही गाणी आपल्याला जाणवून देतात की या जगात आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या दुःख, यातना यापेक्षा मृत्यूच्या स्वाधीन का होऊ नये ?मृत्यूनंतर नातेवाईक, मित्र पुन्हा आपल्या कामाला लागतात.जीवन क्षणभंगुर आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आजकाल तर मृत्यूपश्चात दुसऱ्यादिवसापासून टीव्ही ,मोबाईल ,गप्पा हसणं खिदळणं सुरू होतं.जनपळभर म्हणतील हाय हाय.  कोणतेच व्यवहार कोणा वाचुन अडत नाही. जीवनाचे रहाटगाडगे चालूच राहते. सूर्य,चंद्र, तारे आपला प्रवास सुरू ठेवतील. पुन्हा आपल्या कामी लागतील. अशा जगास्तव काय कुढावे, मोही ची कुणाच्या का गुंतावे ?शांतीत का जिरवू नये काया. इतक्या यातना, दुःख, या ढोंगी जगाकडून मिळतात. मृत्यूनंतरच शांती मिळते. जीवनात करू नये  जास्त वांदे , कारण शेवटी आहेत फक्त चार खांदे. याची जाणीव माणसाला पाहिजे. जीवन आहे तोपर्यंतच भरभरून जगा, दुसऱ्यासाठी जगा, स्वतःसाठीजागा. मृत्यूचा विचार करण्यापासून परावृत्त व्हा. मृत्यू येणारच आहे, त्याला हसत स्वीकारा. मग या मृत्यूची भीती वाटत नाही. सध्या जे भेडसावतेय त्यापेक्षा मृत्यू निश्चित चांगला आहे. बुडते हे जग न देखवे डोळा.याची देहा,याची डोळा, लोकाकडून अवहेलना करून घेण्या पेक्षा मृत्युला जवळ कां करू नये. अशा सुखाच्या दुःखाच्या जाणिवा लतानी आम्हाला करून दिल्या आहेेत. हेआम्ही कधीच विसरूशकणार नाही.

— डॉ.अनिल कुलकर्णी.

९४०३८०५१५३

anilkulkarni666@gmail.com

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 30 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..