कसा, काय, कोण खेळला बघत नाही कुणी
खेळातील यश अपयशच्या राहतात फक्त आठवणी ||१||
मरून गेला नाटककार तो नावही गेले विसरूनी
जिवंत आहे आजही नाटक रचिले होते, त्यांनी ||२||
जगास हवे कर्म तुमचे नको तुमचे जीवन
पशूसही जीवन असते मरतो तो तसाच येवून ||३||
वाल्याने केले खून लोक विसरूनी जाती
आजही वाचता रामायण कौतूक त्याचे करिती ||४||
वेश्ये घरी राहीलेला, गेला कालीदास विसरुनी
मेघदूत, शाकूंतल वाचता, महाकवीच्या येई आठवणी ||५||
वेचत असतो फूले आम्ही, सोडूनी सारे काटे
लोकही घेती उचलूनी त्यांना जे चांगले वाटे ||६||
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply