कसा, काय, कोण खेळला
बघत नाही कुणी
खेळातील यश अपयशाच्या
राहतात फक्त आठवणी
मरुन गेला नाटककार, तो
नांव ही गेले विसरुनी
जिवंत आहे आजही नाटक
रचिले होते त्यांनी
जगास हवे कर्म तुमचे
नको तुमचे जीवन
पशूसही जीवन असते
मरतो तो तसाच येऊन
वाल्यानें केले खून
लोक विसरुनी जाती
आजही वाचतां रामायण
कौतूक त्याचे करिती
वेशेघरी राहिलेला
गेला कालीदास विसरुनी
मेघदूत, शाकूंतल वाचतां
महाकवीच्या येती आठवणी
वेचीत असतो फुले
आम्हीसोडून सारे काटे
लोकही घेती उचलूनी
त्यांना जे चांगले वाटे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
Leave a Reply