नवीन लेखन...

तुम्हाला काय येत नाही?

नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली.

बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ होता. अचानक त्या बर्फाला दडा गेला, एक भोक पडले व त्या भोकातून खेळत असलेल्या मुलांपैकी एक मुलगा घसरून बर्फाखाली असलेल्या थंडगार पाण्यात पडला. दुसर्‍या मुलाने हे पाहीले व लगेच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिथे गर्दी पण जमली व कोणीतरी या अपघाताची खबर पोलीसांना दिली. दरम्यान दुसरा मुलगा धावत आला व पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला बाहेर खेचून काढायचा प्रयत्न करू लागला. पण भोक लहान असल्यामूळे हे त्याला जमेना. त्याला जवळच एक मोठे झाड दिसले. त्याने पळत जाऊन त्या झाडाची एक मोठी फांदी तोडून आणली व त्या फांदिच्या सहाय्याने भोकाचा आकार मोठा करून पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला खेचून बाहेर काढले. तेवढ्यात पोलीस व पॅरॅमेडिकलचे लोक तेथे पोचले. त्यांनी पाण्यात पडलेल्या मुलाला योग्य ती वैद्यकीय मदत दिली व त्या मुलाचे प्राण वाचवले. पण तेथे आलेल्या पोलीसांना व पॅरामेडिकलच्या लोकांना एका गोष्टीचे राहुन राहुन आश्चर्य वाटत होते की एका छोट्या मुलाने झाडाची भली मोठी फांदी तोडून आणलीच कशी. त्यांची याच विषयावर चर्चा चालू होती तेव्हा एक वृद्ध म्हातारबुवा तेथे आले वम्हाणाले, ‘मला महीत आहे की या मुलाने ही झाडाची फांदी कशी तोडली ते.’

‘अस मग सांगा या मुलाने ही फांदी कशी तोडली? त्याला हे कसे जमले?’ पोलीसांनी उत्सुकतेने विचारले.

‘कारण ‘तु हे करू शकत नाहीस किंवा तुला हे जमणार नाही!’ असे सांगणारा कोणी माणूस नव्हता म्हणून!’ म्हातारबुवांनी मिस्कीलपणे उत्तर दिले.

आपल्यामधे काहीतरी आगळेवेगळे, अतर्क्य किंवा अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवण्याची एक प्रकारची प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. संकटकाळात ही उर्जा बाहेर यावी व त्यामुळे माणसाने संकटावर मात करावी अशी देवाने योजना केलेली असते. प्रत्येकाकडेच ही उर्जा असते व अनेक वेळा याचा वापर करून काहीतरी आगळेवेगळे करून दाखवावे अशी इर्शा प्रत्येकाच्याच मनातकेव्हा ना केव्हातरी निर्माण होत असते. पण ‘तुला हे जमणार नाही. तुला हे शक्य होणार नाही. तुझ्यात तेवढी ताकद नाही. तुझ्या बुद्धीला हे झेपणार नाही.’ यासारखी‘नकारात्मक’ टिपण्णी करणारेच जास्त भेटतात. ‘तु स्वतःला काय फार शहाणा समजतोस काय? तुला फार अक्कल आली असे वाटले तरी तो तुझा गैरसमज आहे. डोन्ट बी ओव्हरस्मार्ट’अशांसारखी वाक्ये हे लोक सहजरित्या तोंडावर फेकून आपल्याला नामोहरम करत असतात. आपण करायचे नाही व दुसर्‍याला करू द्यायचे नाही असा यांचा खाक्या असतो. मला तर लहानपणापासून अशी माणसे सतत भेटत आली आहेत. यांच्याकडे ‘आपण काय करू शकतो’यापेक्षा ‘आपण काय करू शकत नाही.’ याचीच यादी भलीमोठी असते. दुर्दैवाने मराठी समाजात अशा प्रकारच्या ‘नकारात्मक’ मनोवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणावर आहेत असे मला आढळून आले आहे.

समजा एखाद्याने असे काही ‘अचाट’ काम करण्याचा प्रयत्न केला व त्यात तो अपयशी ठरला तर हीच माणसे, ‘तरी मी त्याला सांगत होतो की नसते धाडस करू नकोस, अंगाशी येईल! तरी मी त्याला सांगत होतो की तु तोंडाघशी पडशील! तरी मी त्याला सांगत होतो की हा असला येडपटपणा करू नकोस!’ असे म्हणत स्वतःच्या शहाणपणाची मिजास मारायला व स्वतःची पाठ थोपटून घ्यायला तयारच बसलेले असतात. ही अशी माणसे एखादी गोष्ट कशी यशस्वी करायची याचे मार्ग शोधत न बसता ही गोष्ट का करू नये याची कारणे शोधत बसतात. बहुतेक वेळा अशा या ‘नकारात्मक’माणसांची सुरवात आपल्या कुटुंबापासूनच होते.

ज्या समाजात अशी ‘नकारत्मक’ विचारसरणीची माणसे जास्त प्रमाणात असतील तो समाज जास्त विकास करू शकत नाही. आज जरी मराठी समाजाने प्रगतीच्या कितीही डिंग्या मारल्या तरी अनेक बाबतीत मराठी समाज हा अजुनही‘अत्यंत मागासलेला’च आहे व तो पुढारण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत. म्हणुनच गेल्या 400 वर्षांत शिवाजीमहाराजांच्या तोडीचा एकही माणूस या महाराष्ट्रात पैदा होऊ शकला नाही.

अर्थातच आपण ‘सकारात्मक’ रहायचे का‘नकारात्मक’ रहायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतःच ठरवायचे नाही का?

उल्हास हरी जोशी
मोः-9226846631

July 26, 2015

उल्हास हरि जोशी
About उल्हास हरि जोशी 31 Articles
श्री उल्हास जोशी हे गुंतवणूक विषयक सल्लागार असून ते Financial Health या विषयावर जनजागृती करतात. या विषयावरील त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ते मेकॅनिकल इंजिनिअर असन ४० वर्षे मार्केटिंग आणि सेल्स या क्षेत्रात कार्यरत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..