नवीन लेखन...

‘ट्वीटर’ चा वाढदिवस

ट्वीटरची सुरुवात २२ मार्च २००६ रोजी झाली. व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम यांच्याप्रमाणेच एक सोशल माध्यम म्हणून ट्विटर हे लोकप्रिय आहे. हे सुरक्षित व चांगले माध्यम असल्यामुळे एक छोटेसे ब्लॉक म्हटले तरी हरकत नाही याचा वापर हे सर्व नेते सेलिब्रिटी आणि जास्तीत जास्त युवा याचा वापर करत असतात.

ट्विटर वर लाईक, कमेंट आणि retweet चे बटन असतात. जर तुम्हाला एखादी ट्विट आवडली तर त्या सुटला तुम्ही लाइक करू शकता.

जर तुम्हाला आवडले की तुम्हाला फोन करत असणाऱ्या लोकांना ती ट्विट रिट्विट करायचे आहे त्यांना दाखवली पाहिजे तर तुम्ही ती ट्विट रिट्विट करू शकता. तुम्हाला एखाद्या कमेंटने असेल तर कमेंट मध्ये तुम्ही काही कमेंट देऊ शकतात.
जॅक डॉर्से, इव्हान विल्यम्स, बिझ स्टोन यांनी ट्वीटरची कल्पना जन्माला घातली.

मोबाइल फोनवरचा एक मेसेज अनेकांना एकाच वेळी पाठवता येईल का असा विचार त्यांच्या कडे आला. यातले डॉर्से वगैरेंना तर पदवीदेखील मिळायची होती त्या वेळी. फेसबुकच्या जन्मासारखंच हेही. कॉलेजमधल्या सर्वासाठीच एखादा असा समान नोटीस बोर्ड करता येईल का, या प्रश्नाच्या उत्तरातनं फेसबुक जन्माला आलं. तसंच एकच मेसेज अनेकांना पाठवता येईल का, या साध्या इच्छापूर्तीच्या प्रयत्नातून ट्विटर जन्मलं. कल्पना साध्या निरोपाची होती आणि निरोप हे लहानसेच असतात. त्यामुळे याला नावही तसंच दिलं गेलं. ट्विटर म्हणजे पक्ष्याची चिवचिव. ऐकू येतीय असं वाटते, पण शोधू गेलं तर दिसेनाशी होते. ट्विटर तसंच होतं आणि अजूनही आहे. ट्वीटर वर सर्वात पहिले ट्वीट हे २२ मार्च २००६ ला करण्यात आले होते, आणि ते ट्वीटरचा फाउंडर जॅक डॉर्सेने केलं होते. ह्या ट्वीटला १ लाख वेळा रीट्वीट करण्यात आले होते.

बघता बघता ट्वीटर वाढलं. जन्मानंतर एकाच वर्षांत, २००७ साली, एकूण ट्विट्सची संख्या होती चार लाख. पुढच्या वर्षी ती झाली थेट १० कोटी. त्यानंतर आणखी एक वर्षांनंतर तर दर दिवशीचे ट्विट्स पाच कोटींवर गेले. २०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्‍‌र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले.

२०१३ साली, सप्टेंबर महिन्यात ट्विटरचा पब्लिक इश्यू आला. भांडवली बाजारातून कंपनीनं विस्तारासाठी पैसे उभे करायचं ठरवलं. कंपनीला उभे करायचे होते १०० कोटी डॉलर. विस्तार, तंत्रशोध वगैरेसाठी. प्रत्यक्षात किती हाती आले? तर ३१०० कोटी डॉलर. कंपनीची लोकप्रियता इतकी होती की समभागांना प्रचंड मागणी होती. अजूनही आहे. सुरुवातीला अनेकांना इतका काही प्रतिसाद या ट्विटरला मिळेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या या उत्साहानं सगळेच अचंबित झाले.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..