तो सप्टेंबर दहा २०११ चा शनिवार होता. प्रवासी दारेसालाम बंदरातून रात्री ठीक बारा वाजता प्रवासाला निघाले पेम्बा बेटाकडे .“साहेब, केवढे प्रवासी कोंबलेत आज ! आम्हाला नाही जायचं या गर्दीत” चार प्रवासी तणतणत बोटीतून उतरलेसुध्दा. खरं म्हणजे, ते मरता मरता वाचले होते.
पेम्बा बेटाकडे निघालेली ‘स्पाईस आयलॅंडर्स’ नौका भर महासागरात बुडाली. त्यावेळी जोराचे वादळ सुरू झाले. तुफानात बोट दोन्ही बाजूला कलंडायला लागली. निघतेवेळी सहाशे प्रवासी-क्षमतेच्या बोटीत त्या रात्री 3500 प्रवासी खचाखच भरले होते. एका अंदाजाप्रमाणे २०६ जणांना कसेबसे जीवदान मिळाले. २४० प्रवासी बुडून ठार झाले. एकूण २९०० बेपत्ता किंवा मरण पावले. हे आकडे ऐकणाऱ्याची मती गुंग करणारे होते. लांबच्या प्रवासात अकस्मात काहीही घडू शकतं. म्हणून घरातली आई किंवा आजी घरातून निघतांना हातावर दहीसाखर देऊन भाळावर प्रसन्नसा लाल टिळा लावते. माऊलीच्या भाबड्या मनात येत असतं, कुठला बरा-वाईट प्रसंग प्रवासात ओढवलाच तर तरंगायला कुठुन तरी वाहत आलेलं फळकुट लेकराच्या हाती यावं -झांझीबारच्या हुसेनला मिळालं तसं.
– अरुण मोकाशी
परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.
हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/
किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-
Leave a Reply