सकाळी आम्ही सर्व अंगणात बसलेलो ,बऱ्याच विषयावर आई आणि माझ्या गप्पा सुरू होत्या. आईला विविध विषयावर चर्चा करायला फार आवडत. आमचे बोलणे चालूच होते तर अंगणामध्ये एक लहान जेमतेम १२-१३वर्षाची मुलगी आली ,तिच्या डोक्यावर झाळूचे भले मोठे गाठोडे बांधलेले. तिच्या निरागस चेहऱ्यावर ते सर्व झाडू विकायची काळजी होती. असे असताना तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होत ,आईकडे पाहून तिने सुंदर हास्य दिले. ती खूप गरीब होती इतक्या लहान वयात तिच्यावर घराची जबाबदारी येऊन ठेपली होती. आईने तिच्या डोक्यावरचे ओझे खाली ठेवले , मला पाणी आणायला सांगितले. मी पं घेऊन आले तिच्या सोललेल्या चेहऱ्यावर भुकेची छबी जाणवत होती आईने तिला जेवणाचे विचारले ,तिने नाही म्हटले पण आईने बेटा खाऊन घे दोन घास असे म्हणताच तिचे डोळे भरून आले. आईने तिला पोटभर जेवायला दिले. जेवताना तिला सजच प्रश्न केले. तू कुठे राहते ?हे काम इतक्या लहान वयात का करते?मग तिने सांगितले ते मूळचे मध्यप्रदेशचे पण तिच्या बाबाचे निधन झाले आणि घरची बेताची परिस्थिती अश्यात पोट कसे भरवे हा मोठा प्रश्न. मी तिला तिच्या शिक्षणाचे विचारले तेव्हा ती म्हणाली आम्हाला पोट भर भाकर मिळणे कठीण आहे तिथे शिक्षणाचा प्रश्न च येत नाही. ते पोटच्या भाकरीसाठी वाटेल ते काम करतात ,गावोगावी फिरून झाडू बनून विकतात तर कधी टिनाच्या डब्ब्या चे काही बनून ते विकून पैसे कमुन आपली उपजीविका भागवतात. आश्याप्रकरे त्यांच्या आयुष्याचे चक्र चालू होते. आईने तिचा वेळ न घेता दोन झाडू विकत घेऊन तिला काही पैसे आणि धान्य दिले. तिने पुन्हा स्मित हास्य देऊन आमचा निरोप घेतला. ती मुलगी गेल्यानंतर मात्र मला अनेक विषयाने घेरले खरचं माणसापेक्षा आज पैसा खूप मोठा झाला आहे ,या पैश्यामुळेच तर बिचाऱ्या त्या लहान मुलीला शिक्षण घेता आले नाही ,अगदी लहान वयात तिच्यावर घरची जबाबदारी आली. खरतर या लाहण्या जीवाला पैश्याची मदत करून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मदत केली पाहिजे कारण आज आपल्या अवतीभोवती आपल्याला असे अनेक उदाहरणे सापडतील ज्यामुळे या निरागस बालकांचे शिक्षण वाया जाऊन त्यांना घरची जबाबदारी पेलावी लागते. तर चला या मुलांना मदत करूया शिक्षण ही आपल्या समाजासाठी खूप परिवर्तनाची लाट आहे ज्यामुळे समाजातील अंधार कमी होतो. पैश्यामुळे कोणाचे शिक्षण न थांबता त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करुया.
अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जी अकोला