१९५२ साली प्रदर्शित झालेल्या लाखाची गोष्ट या चित्रपटातील हे गाणे. हे गीत लिहिले ग.दि.माडगुळकर यांनी. पहाडी (नादवेध) या रागातील हे गाणे असून गाण्याला संगीत दिले सुधीर फडके यांनी तर गाण्याच्या गायिका आहेत मालती पांडे.
त्या तिथे, पलिकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे !
गवत उंच दाट दाट
वळत जाइ पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे
कौलावर गारवेल
वार्यावर हळु डुलेल
गुलमोहर डोलता
स्वागत हे केवढे !
तिथेच वृत्ति गुंगल्या
चांदराति रंगल्या
कल्पनेत स्वर्ग तो
तिथे मनास सापडे
Leave a Reply