माझ्या भावाची बायको, म्हणजे माझी वहिनी, हीच्या हाताचे हाड मोडले आणि plaster मध्ये आहे हात.
त्या वर माझ्या भावाने एक कविता बनवली आहे. वाचनीय आहे म्हणून पाठवतो…
— सतिश कोठारे
विद्याच्या फ्रॅक्चर नंतर मला झालेली जाणीव ……
सांग तुझा हा तुटलेला हात पुन्हा केंव्हा सांधणार ?
थट्टेत कधी बोललो, “तुझ्या विना माझं नाही अडत.”
ठाऊक नव्हते होईल त्याची शिक्षा एवढी कडक !
साधी मस्करी सुद्धा कधी मी करू नये का तुझी ?
मोठ्या मनाने ही एक आगळीक पोटात घे माझी.
असेल बिघडत तुझ्या हातचे कधी स्वयंपाक पाणी,
पण तरीही होते त्याच्या पायी पोटाची खळगी भरणी.
रोज काय रांधावे या विवंचनेनेच होतो इतका त्रास,
माझ्या साऱ्या कामांची त्यापुढे काय असे पत्रास?
धुतलेल्या कपड्यांची केवढी मोठी पडली रास,
अर्धे आवरले तरी वाटे, “पुरे आता एवढे बास.”
भांडी कुंडी नीट लावण्यात जातात तासंतास,
कधी गरज पडता ती शोधूनही सापडेना अंतास.
रात्री पाठ लावतो शय्येला तरी डोळे उघडे सताड,
उद्याची कामं उभी राहतात नजरेपुढे ताड माड.
कान धरतो, परत नाही असा विचार सुद्धा करणार,
सांग तुझा हा तुटलेला हात पुन्हा केंव्हा सांधणार?
कवी – किरण कमलाक्ष कोठारे.
१९-०६-२०१७.
— सतिश कोठारे यांनी पाठवलेली ही कविता…
Leave a Reply