कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन
जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन…१,
झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले
सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले…२,
कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी
जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी…३,
गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला
सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला…४
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
Leave a Reply