उचलून जेव्हा पापण्या माझ्याकडे तू पाहिले
चांदणे चंद्राविना मी सांडताना पाहिले
पौर्णिमा उतरुन आली की धरेचा स्वर्ग झाला
ऐश्वर्य साऱ्या नंदनाचे बहरताना पाहिले पाहिले
तू चुकवूनी सारे पहारे भोवतीचे
लाजले मी भासुनी तू लोचनांनी स्पर्शिले
पाहतां तू अंतरीचे शल्य माझ्या फूल झाले
लोचनांसाठीच या मी ताप सारे साहिले
मानिनी होते कधी मी या क्षणी झाले सती
वाहुनिया सारे तुला मी हे रितेपण ल्यायले.
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply