तूच आदिशक्ती तूच आदिमाया ,
सदैव ठाकतेस उभी, अमंगल नष्टाया.
आगमने तुझ्या सारे, मंगल होऊदे,
उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे ,
नवरात्रीचा जागर, होई तुझा आई,
अस्तित्वे तुझिया, कळीकाळ पळून जाई.
संकट महामारीचे, समूळ अता जाऊदे,
उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे ,
वात्सल्य आईचे, नेत्री तुझ्या दिसतसे,
वास्तव्ये तुझ्या दुष्कृत, भयकंपित होतंसे.
अष्टभुजा तू , सदैव वास मनी राहूदे ,
उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे ,
मनोभावे करतो आज, तुझी घटस्थापना,
आई तुझ्या पायाशी, एक मनोकामना.
निंद्य सारे विरून जावो, वंद्य तेची येऊदे,
उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे ,
उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे ,
प्रासादिक म्हणे.
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply