आज बॉलिवूडचे प्रसिध्द गायक उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी.बी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी लोकांचे गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात ‘सिंदूर’ या नेपाळी गाण्याने केली होती. १९७८ मध्ये ते मुंबईला आले.
१९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा एका सिनेमात गाण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना खरी ओळख ‘कयामत से कयामत तर’मधून मिळाली. या सिनेमातील ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उदित नारायण यांना २००९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. आपल्या आवाजासाठी त्यांना तीनवेळी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट गायकचे ५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हे पुरस्कार ‘कयामत से कयामत तक’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘राजा हिंदुस्तानी’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’सारख्या सुपरहिट सिनेमांसाठी मिळाले आहेत.
उदित नारायण यांनी आतापर्यंत ३० भाषांमध्ये जवळपास १५ हजार गाणी गायली आहेत. उदित नारायण यांचा मुलगा आदित्य तो गायक आणि अभिनेता आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
Leave a Reply