एक जीवनप्रवास (थोडक्यात)
काही वर्षांपूर्वी आमच्या एरीयात एकदम धिंचाक सजवलेल्या दोन रिक्षा आणि एक कार फिरायची ज्यांच्या मागे लिहिलेलं होतं ” सुनीलशेठ से एक मांगो, सुनीलशेठ दो देता हैं “
काही दिवसांनी एक रया गेलेली रिक्षा दिसायची. एक भारदस्त आणि कधीकाळी गबर असावा असा दिसणारा माणूस ती चालवत असायचा. मागे लिहिलेलं होतं ” सुनीलशेठ”.
आजकाल एक जीर्ण झालेली रिक्षा फिरत असते. एक गोरागोमटा पण केविलवाणा दिसणारा तरूण मुलगा ती चालवत असतो. मागे लिहिलेलं आहे ” कै. सुनील शेठ”
–अमोल पाटील
Leave a Reply