उगवलेला दिवस
सावलीसह सरकतो
जगंलात गेली गुरढोर
रस्ता घराचा धुंडतो
ओढ लागुन पिल्याची
चिमणी ही परतते
काटा रूतयो पायी तरी
अलगद असा काढते
गाय हंबरते मनात
दुधाचा ओवा पान्हावते
थांब रे बाला थोडं
लवकरच मी पोहोचते
पावले झपाझप पडती
घराच्या लागल्या ओढीन
दिस गेला दुराव्याचा
हाक दिली लेकरानं
— शरद शहारे
Leave a Reply