नवीन लेखन...

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ||

ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला   ||१||

उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२||

उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर,  असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला    ।।३।।

उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत,  बघती स्वहीत
गरजवंता अडविती,  शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला    ।।४।।

उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला   ।।५।।

उगवता सुर्य, नमन करती त्याला,  विसरती सारे सुर्यास्ताला.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail-  bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on उगवत्या सूर्याला नमस्कार

  1. डॉ. नागापूरकर यांची “उगवत्या सूर्याला नमस्कार” ही कविता कविवर्य भा रा तांबे यांच्या “मावळत्या दिनकरा” या सुप्रसिद्ध कवितेशी खूप मिळती जुळती आहे. पण चांगली आहे.

    खाली भा रा तांबेंची कविता…..

    मावळत्या दिनकरा
    अर्ध्य तुज जोडोनि दोन्ही करा

    जो तो वंदन करी उगवत्या
    जो तो पाठ फिरवी मावळत्या
    रित जगाची ही रे सवित्या
    स्वार्थपरायणपरा

    उपकाराची कुणा आठवण
    “शिते तोवरी भूते” अशी म्हण
    जगात भरले तोंडपूजेपण
    धरी पाठीवर शरा

    असक्त परि तू केलीस वणवण
    दिलेस जीवन हे नारायण
    मनी ना धरिले सानथोरपण
    समदर्शी तू खरा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..