उगवता सूर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला ||धृ||
ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख
बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती
माना डोलावती, डामडोलाला ||१||
उगवता सूर्य. नमन करती त्याला
प्रथम हवे दाम, तरच होई काम
पैशाच्या भोवती, सारेच फिरती
पैशाचे गुलाम, मानती पैशाला ||२||
उगवता सूर्य, नमन करती त्याला
सत्तेची नशा, दाखवी जना आशा
स्वतःसी समजे थोर, असुनीया शिरजोर
हांजी हांजी करती, बघता सत्तेला ।।३।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला
अधिकाराची रीत, बघती स्वहीत
गरजवंता अडविती, शोषण तयांचे करती
सलाम करती, अधिकाराच्य़ा खुर्चीला ।।४।।
उगवता सुर्य़, नमन करती त्याला
कालचा नटसम्राट, होता अती श्रेष्ठ
डोंगर उतरला त्यानी, आज विचारिना कुणी
जवळ करती, उमलणाऱ्या फुलाला ।।५।।
उगवता सुर्य, नमन करती त्याला,
विसरती सारे सुर्यास्ताला.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply