उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल,
संपतील तणाव चिंता,
स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, —-
मोल देत कसा नाचेल ,
भरारी घेत आभाळा,
उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना,
सतत रुंजी घालत राहील,— इवल्याशा त्याच्या मनात,
*मुक्तीचा आनंद भरेल,
विश्वास ठेवू तरी कसा,
मनी भावना उफांळेल,—
सुटली ही भयानक कारा
ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां,
आता आपल्या कवेत घेईल, झुगारून तुटक्या बंधनांना,
जगावर साऱ्या राज्य करेल,—
आता कशा असंख्य वाटा,
जीव कसा आनंदेल,
स्वर्गीय स्वरूपीं समाधानां,
हृदयात तो सांभाळेल,—
अवलोकत पूर्ण क्षितिजा ,
कसा मग तो भिरभिरेल,
पाहून येईल मोक्षद्वारा ,
जिथे जाणे अंती असेल,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply