उमजूनी सारे, कां न कळते
पाऊल उगाच कां अडखळते।।धृ।।
मन हे निष्पाप कोकरुं
ओढिता लागते घाबरुं
समजावे किती मनाला
अटळ जीवा, निर्वाण ते।।
येवुनी जगती जाणे असते
दशावतारही होवुनी गेले
संतमहंतही होवुनी गेले
चिरंजीवी कां सारे असते।।
तगमगता जीव केविलवाणे
भाववात्सल्य जीवा ओढिते
प्रीत विरह, मरण जीवाला
म्हणुनी ते कां कधी चुकते।।
जाणावी पराधीनता मानवी
स्मरावे ” सुमनास अंतरी
उमजावी सारी नाती लाघवी
इतुकेच आपुल्या हाती असते।।
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १२४.
२८ – ४ – २०२२
Leave a Reply