चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या
फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या
निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं
स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं
चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची
प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची
आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें
मध शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे
सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी
जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी
हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी
क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply