समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.
‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील सारी महत्वपूर्ण बक्षिसे पटकावली. ‘आरभाट कलाकृती या नावाने गिरीश – उमेश कुलकर्णी संस्था चालवतात. ‘देऊळ’हा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी गिरीश – उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाला.
मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक – दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
जया बच्चकन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा अभिनय आणि त्यांच्याडतील कौशल्य सर्वप्रथम हेरलं आणि या चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला. उमेश कुलकर्णी गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. लघुपटांवर उमेश कुलकर्णी यांचे खास प्रेम आहे. त्यांची दिग्दर्शक म्हणून ओळखही याच माध्यमातून झाली होती. त्यामुळे एक प्रकारे लघुपटनिर्मितीची चळवळच त्यांनी सुरू केली असून लघुपटनिर्मितीचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply